देशातील ‘हे’ शहर स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित, काय आहे आकडेवारी ?

| Updated on: Sep 20, 2022 | 3:56 PM

भारतातील अनेक शहरांमध्ये गुन्हेगारीवर अंकुश नाही आणि सातत्याने गुन्हे वाढत आहेत. अशा परिस्थितीत आज देशातील कोणते शहर सर्वात असुरक्षित आहे ते जाणून घेऊया..

देशातील हे शहर स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित, काय आहे आकडेवारी ?
most unsecure city
Image Credit source: Tv9
Follow us on

भारतातील (India) अनेक शहरांमध्ये गुन्ह्यांची (Crime) आकडेवारी सातत्याने वाढत आहे. मोठ्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर वर्षभरात दर १० लाख लोकसंख्येमागे १५ हजारांवर गुन्ह्यांचा आकडा पोहोचला आहे. त्याचबरोबर महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. गुन्ह्यानुसार कोणत्या शहरात काय परिस्थिती आहे, आज देशातील कोणते शहर सर्वात असुरक्षित आहे?, हे जाणून घेऊया. देशाची राजधानी दिल्ली (Delhi) हे सर्वात असुरक्षित शहर आहे. येथे गुन्ह्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. तर पश्चिम बंगालची राजधानी असणारे कलकत्ता (kolkata) हे शहर सर्वात सुरक्षित आहे. तेथे गुन्ह्यांची संख्या अतिशय कमी नोंदवली गेली आहे. येथे दर 10 लाख लोकांमागे केवळ 1034 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

सर्वात सुरक्षित शहर कोणते ?

पश्चिम बंगाल राज्याची राजधानी असलेले कलकत्ता हे देशातील सर्वात सुरक्षित शहर आहे. ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या शहरात गुन्ह्यांची संख्या अतिशय कमी नोंदवली गेली आहे. कलकत्तामध्ये गुन्ह्यांची संख्या अतिशय कमी नोंदवली गेली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई या यादीत 6 व्या स्थानावर आहे. तेथे 4285 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

सर्वात असुरक्षित शहर कोणते ?

देशाची राजधानी दिल्ली हे भारतातील सर्वात असुरक्षित शहर आहे. येथे दर 10 लाख लोकांमागे 18 हजार 596 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

हे सुद्धा वाचा

कोणत्या शहराची आहे काय स्थिती ?

इतर शहरांबाबत बोलायचे झाले तर दिल्ली नंतर सूरत, कोच्ची, अहमदाबाद, चेन्नई, इंदोर, जयपूर, नागपूर, पाटणा, गाझियाबाद इत्यादी शहरांचा असुरक्षित शहरांच्या यादीत समावेश आहे.

शहर गुन्ह्यांची संख्या

1) कोलकाता 1034

2) पुणे 2568

3) हैदराबाद 2599

4) कानपूर 3365

5) बंगळुरू 4272

6) मुंबई 4285

7) कोचिकोड 5158

8) लखनऊ 5909

9) कोईम्बतूर 6494

10) गाझियाबाद 6989

11) पाटणा 8720

12) नागपूर 8921

13) जयपूर 10269

14) इंदोर 11071

15) चेन्नई 13247

16) अहमदाबाद 15190

17) कोच्ची 16022

18) सूरत 16768

कोणत्या शहरात महिलांवरील अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे ?

महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांबाबत बोलायचे झाले, तर या यादीत सर्वात पहिले स्थान राजस्थानमधील जयपूर शहराचे आहे. तेथे 2021 साली 345 गुन्हे समोर आले. तर दिल्ली व इंदोरमध्ये 159, नागपूर 94, लखनऊ 70, कोच्ची 68, मुंबई 43, पुणे 40, पाटणा 31, हैदराबाद 31, गाझियाबाद 31 तर बंगळुरूमध्ये स्त्रियांवर अत्याचार झाल्याचे 29 गुन्हे समोर आले आहेत.