संतापजनक ! मुक्या जनावरांनाही नाही सोडलं, अंधाराचा फायदा घेत गाईवर ॲसिड हल्ला

| Updated on: May 04, 2024 | 9:14 AM

पुण्यातून एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. मावळ जवळील एका गावात गाईवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याचा अतिशय संतापनजक प्रकार उघडकी आलाय. मुक्या जनावरावर झालेल्या या हल्ल्यामुळे गावात एकच खळबळ माजली असून संतापाचे वातावरण आहे

संतापजनक  ! मुक्या जनावरांनाही नाही सोडलं, अंधाराचा फायदा घेत गाईवर ॲसिड हल्ला
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पुण्यातून एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. मावळ जवळील एका गावात गाईवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याचा अतिशय संतापनजक प्रकार उघडकी आलाय. मुक्या जनावरावर झालेल्या या हल्ल्यामुळे गावात एकच खळबळ माजली असून संतापाचे वातावरण आहे. अंधाराचा फायदा घेत अनोळखी इसमाकडून कान्हे येथे गोठ्यातील गायीवर ॲसिड हल्ला करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ जवळच्या कान्हे गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. कान्हे गावातील तुषार सातकर या शेतकऱ्याची गाय आहे. पहाटे दूध काढण्यासाठी तुषार सातकर हे गोठ्यात गेले होते. मात्र गोठ्याचे दार उघडताच त्यांना समोर धूर दिसला आणि एकच धांदल उडाली. काय झाले हे पाहण्यासाठी सातकर यांनी पुढे धाव घेतली आणि समोरचं दृष्य पाहून ते हादरलेच. त्यांच्या गोठ्यातील एका गायीवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याने ती चांगली जखमी झाली. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

समोर असलेल्या 4 शर्यतीच्या बैलजोडी सोबत 10 म्हशी आणि एक गावरान गाय बांधलेली होती. ही गाय गोठ्याच्या दर्शनीय भागत असल्मुळे अज्ञात हल्लेखोराने त्याच्या हातातील ॲसिड गाईच्या पोटावर आणि पायावर टाकले आणि तिला जखमी अवस्थेत सोडून तो तेथून फरार झाला. या हल्ल्यात ती गाय गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र
या घटनेमुळे मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुक्या प्राण्यावर या प्रकारे निर्घृण हल्ला कोणी आणि का केला असावा, असाच प्रश्न सध्या सर्वजण विचारत आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.