लातूर : एखादं संकट कोसळल्यानंतर शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) करायला. परंतु लातुर जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर संबंधित तलाठी विष्णू तिडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटेगाव (Mothegaon) येथील दत्ता असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव आहे. ते लातूर जिल्ह्यातील सोमवंशी या गावातील रहिवासी आहेत. त्यांनी मोबाईलवरती स्टेटस ठेऊन आत्महत्या केल्याने संपुर्ण गावात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थ संतप्त झाले असल्याने पोलिस तलाठ्याला (Talathi) ताब्यात घेऊन चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मोबाईलवर स्टेटस ठेवत तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या प्रकरणात आता तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातल्या मोटेगाव येथील दत्ता सोमवंशी ( वय-२८) या तरुण शेतकऱ्याने मोबाईलवर तलाठी त्रास देत असल्याने आत्महत्या करीत असल्याचे स्टेस्ट ठेवत गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित जमीन स्वतःच्या नावावर होत नसल्याने दत्ता सोमवंशी हे अडचणीत आले होते. पैश्यांची मागणी करीत तलाठी जमीन नावावर होऊ देत नव्हता त्यामुळे दत्ता यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी आता रेणापूर पोलीस ठाण्यात तलाठी विष्णू तिडके याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.