पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्श कारची धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दोन आठवड्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवत दोघांना उडवलं. पुण्यातील हे प्रकरण सध्या तापलेलं असतानाच शिरुर तालुक्यातही पोर्श पॅटर्नचीच पुनरावृत्ती झाली आहे. पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने ३० वर्षांच्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात एवढा भीषण होतो की त्या मालवाहू पिकअप ट्रकने बाईकसकट त्या चालकाला 20 ते 30 फुटांपर्यंत फरपटत नेले. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
कसा झाला अपघात?
हा अपघात घडला तेव्हा शिरूर तालुक्यातील अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी ( वय अंदाजे 15) ही पिकअप वाहन चालवत होती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तरच तिच्या शेजारील सीटवर पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते. मात्र अचानक तिच्या मालवाहू टेम्पोची एका बाईकला धडक बसली आणि बाईकसकट चालकही बराच दूरपर्यंत फरपटत गेला.
धक्कादायक गोष्ट म्हणजे हा अपघाता झाल्यानंतर तो पोलिस पाटील आणि त्याची मुलगी हे दोघेही मदतीसाठी आलेच नाहीत. उलट मालवाहू टेम्पो तिथेच घटनास्थळ सोडून त्यांनी तेथून पळ काढला. या घटनेत अरुण मेमाणे याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे.
याप्रकरणी मयत अरुण मेमाणे यांचा भाऊ सतिश मेमाणे याने शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलीचे वडील अरणगावचे पोलिस पाटील संतोष लेंडे यांच्यासह टेम्पो चालवणाख्या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला आहे . शिक्रापूर पोलिस असुन या गुन्ह्याच्या अधिक तपास करत आहेत.