मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : मुंबईच्या चेंबूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चेंबूरमधील पोस्टल कॉलनीतील बीएआरसी क्वाटर्समध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. अवघ्या 19 वर्षांच्या तरूणीवर दोन नराधमांनी हा अत्याचार केला. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या दोन नराधम आरोपींना अटक केली आहे. विद्यार्थिनीने पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी आधी तिला विश्वासात घेऊन तिला गुंगीचं औषध मिसळलेलं पेय प्यायला दिलं आणि त्यानंतर क्वार्टर्स मध्ये तिच्यावर अत्याचार केला.हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ माजली आहे.
आरोपींना आधीपासून ओळखत होती पीडित तरूणी
ही घटना 16 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 12.30 च्या दरम्यान घडल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले. पीडित मुलीचे वडील हे BARC कर्मचारी आहेत. खरंतर ती पालघर जिल्ह्यातील भोईसर येथे तिच्या आई आणि बहिणीसोबत राहते. मात्र काहीवेळा ती मुंबईत वडिलांसोबत BARC फ्लॅटमध्ये राहते. आरोपी अजित हा तिच्या वडिलांच्या शेजारील फ्लॅटमध्ये राहत असल्याने ती त्याला आधीपासून ओळखत होती.
बेशुद्ध करून केला अत्याचार
ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवीश पीडित तरूणी तिच्या वडिलांसाठी जेवण बनवत होती. यावेळी तिला काही सामान हवे होते, पण ते घरात नसल्याने ती शेजारच्या तरूणाकडे मागायला गेली. तेव्हा आरोपी अजित आणि त्याचा मित्र, प्रभाकर यादव घरात होते. त्याने पीडित तरूणीला घरात बोलावून एक कोल्डड्रिंक प्यायला दिलं. मात्र त्याचे काही घोट प्यायल्यानंतर ती तरूणी बेशुद्ध झाली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
रात्री साडे बाराच्या सुमारास पीडितेला शुद्ध आल्यावर आपल्यावर अत्याचार झाल्यचे तिच्या आणि ती तिच्या फ्लॅटवर धावली. पीडितेने इमारतीत राहणाऱ्या तिच्या काही मित्रांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेने आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ३७६ (डी), ३२८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.