चक्क विमानात बिडीचे झुरके मारत होता हेड कॉन्स्टेबल, पकडल्यानंतर दिलेले कारण ऐकून हैराण व्हाल

| Updated on: Sep 06, 2023 | 5:13 PM

विमान प्रवास म्हटलं तर कडेकोट तपासणीसाठी दोन तास आधी जावे लागते. अशात एका प्रवाशाला चक्क विमानात बिडी ओढल्याप्रकरणात अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

चक्क विमानात बिडीचे झुरके मारत होता हेड कॉन्स्टेबल, पकडल्यानंतर दिलेले कारण ऐकून हैराण व्हाल
INDIGO FLIGHT
Image Credit source: socialmedia
Follow us on

बंगळुरु | 6 सप्टेंबर 2023 : विमान प्रवास म्हटला तर कडेकोट तपासण्यांचे सोपस्कार पार पाडून विमान प्रवास करावा लागत असतो. परंतू विमानात चक्क बिडी शिलगावत झुरके मारत आपली तलफ भागवणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाला पकडल्याची घटना घडली आहे. कोलकाता ते बंगळुरु जाणाऱ्या इंडीगो फ्लाईटमध्ये टॉयलेटमधून काही तरी जळाल्याचा तीव्र वास क्रु मेंबर्सला आला. त्यानंतर टॉयलेटमध्ये गेलेल्या व्यक्तीची झडती घेतली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सीआरपीएफच्या एका हेड कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.

कोलकाता – बंगळुरु इंडीगो फ्लाईटमध्ये टॉयलेटमधून काही तरी जळाल्यासारखा तीव्र उग्र वास आल्याने क्रु मेंबर्स सावधान झाले. टॉयलेटमधून 37 वर्षीय केंद्रीय रिझर्व्ह सुरक्षा दलाचे ( सीआरपीएफ ) हेड कॉन्स्टेबल करुणाकरण यांना ताब्यात घेतले गेले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे माचिसही देखील सापडली. ते कोलकाताहून बंगळुरुला उपचारासाठी जात होते. तेव्हा त्यांना अचानक बिडी पिण्याची तलफ आली. त्यामुळे त्यांनी टॉयलेटमध्ये जाऊन बिडी प्यायला सरुवात केली. त्यांच्या बिडीचा उग्र वास सर्व विमानात पसरला.

टॉयलेटमध्ये बिडी पिल्याच्या आरोपाखाली करुणाकरन यांना बंगळुरु येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमान तळावर विमान उतरताच पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सीआरपीएफ हेड कॉन्स्टेबर झारखंड येथे तैनात आहेत. त्यांना बंगळुरु येथे उपचारासाठी जायचे होते. त्यांनी 3 सप्टेंबरच्या रात्री 9.30 वाजता कोलकाता येथील नेताजी बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन इंडीगोचे विमान पकडले होते. त्यांच्या बिडीच्या तलफीने सगळ्यांना टेन्शन आले. विमानात काही तरी जळाल्याचे संशयाने संपूर्ण विमानात खळबळ उडाली. त्यानंतर टॉयलेटमधून बाहेर आलेल्या करुणाकरन याला पकडण्यात आले.

टेन्शन आल्याने बिडी पिली

या प्रकरणात अटक झाल्यानंतर करुणाकरण यांनी आपली तब्येत खराब झाल्याने आपण बिडी पिल्याचे सांगितले. टेन्शन आल्यामुळे आपण बिडी पिल्याचे करुणाकरण यांचे म्हणणे आहे. करुणाकरण यांच्यावर भादंवि कलम 336 ( स्वत: सह दुसऱ्याचे जीवन धोक्यात घालणे ) अनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.