अहमदनगर : अहमदनगर शहरात भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जखमी होऊन आरोपी सादिक बिराजदार याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केलाय. आरोपी सादिकच्या विरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. आरोपी सादिकला भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे कर्मचारी शेख आणि पालवे ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना भिंगार परिसरात सादिकला 5 जणांनी बेदम मारहाण केली असल्याची तक्रार सादिक बिराजदारची पत्नी रुक्सार बिराजदारने पोलीस स्टेशनला दिलेली आहे.
मृत आरोपीच्या पत्नीने तक्रार दिली असली तरी पोलिसांनी मात्र याआरोपांचं खंडन केलंय. आरोपी सादिकला पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना त्याने चालू वाहनातून उडी मारल्याचा दावा भिंगार कॅम्प पोलिसांनी केलाय. पोलीस कर्मचारी शेख यांच्या तक्रारीवरुन आरोपी सादिक बिराजदार याच्या विरोधात 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत सादिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्याला शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान सादिकचा मृत्यू झाला.
Custodial death of Sajid Birajdar in Bhingar camp Ahmednagar