290 कोटींचे व्यवहार कोणाशी? शेतकरीपुत्राला Income Tax विभागाची नोटीस

| Updated on: Mar 15, 2022 | 2:22 PM

मार्च-एप्रिल 2021 मध्ये, त्याला आयकर विभागाची पहिली नोटीस मिळाली होती. मात्र कोणीतरी थट्टा-मस्करी केली असेल, असा समज करुन घेत त्याने दुर्लक्ष केलं. मात्र काही महिन्यांनी 290 कोटींच्या व्यवहाराची दुसरी नोटीस आल्यावर प्रवीणला मोठा धक्का बसला.

290 कोटींचे व्यवहार कोणाशी? शेतकरीपुत्राला Income Tax विभागाची नोटीस
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका शेतकऱ्याचा मुलगा सध्या आयकर विभागाच्या (Income Tax) फेऱ्या मारत आहे. शेतकरीपुत्र प्रवीण राठोड (Praveen Rathor) याला इन्कम टॅक्स विभागाकडून तब्बल 290 कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर राठोड कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. आयकर विभागाने प्रवीण राठोड याला आज (15 मार्च रोजी) अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. यामुळे प्रवीण आयकर विभागापासून स्थानिक पोलिसांपर्यंत दारोदार फिरत आहे. मात्र आजतागायत त्याला या व्यवहाराची कोणतीही माहिती मिळालेली नाही.

काय आहे प्रकरण?

नुकतेच प्रवीण इंदूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयातही गेला होता, मात्र तिथेही त्याला कोणतीही माहिती मिळू शकली नाही. प्रवीण हा मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील देशगावातील शेतकऱ्याचा मुलगा आहे.

मस्करीचा समज

प्रवीण राठोडच्या म्हणण्यानुसार, मार्च-एप्रिल 2021 मध्ये, त्याला आयकर विभागाची पहिली नोटीस मिळाली होती. मात्र कोणीतरी थट्टा-मस्करी केली असेल, असा समज करुन घेत त्याने दुर्लक्ष केलं. मात्र काही महिन्यांनी 290 कोटींच्या व्यवहाराची दुसरी नोटीस आल्यावर प्रवीणला मोठा धक्का बसला.

मुंबईत दोन खाती

प्रवीणच्या नावे मुंबईत दोन बँक खाती उघडण्यात आली आहेत. मात्र आपलं संबंधित बँकेत कोणतंही खातं नाही किंवा आपण साधं कधी मुंबईलाही गेलो नाही, असा दावा त्याने केला आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. मात्र हे प्रकरण मुंबईशी संबंधित असल्याने ते या प्रकरणात काहीही करु शकत नसल्याचे खंडवा पोलिसांनी सांगितले.

ही खाती 2013 मध्ये उघडण्यात आली होती आणि काही व्यवहारांनंतर ती बंदही करण्यात आली होती, अशी माहिती खंडवा बँकेच्या कार्यालयातून मिळाली. घराला आग लागल्याने त्याच्याकडे कागदपत्रे नसल्याचे प्रवीणचे म्हणणे आहे. ही फसवणूक असल्याचे सांगत त्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

संबंधित बातम्या :

 मागितलं एक अन् देवानं दिले तिळे, 19 वर्षानंतर शेतकरी दाम्पत्याला अपत्य, आनंद गगनात मावेना

औरंगाबादेत करंजखेडा बाजार समितीत राडा, गुंड व्यापाऱ्यांची आरेरावी, शेतकऱ्याला जास्त भाव दिल्यानं मारहाण!

शेतीला दिवसा वीज द्या अन्यथा वीज खरेदीतील घोटाळा बाहेर काढू, राजू शेट्टी यांचा इशारा