आमदार गीता जैन यांच्या नावे फेक WhatsApp नंबर, स्थानिकांकडे पैशांची मागणी

| Updated on: Jun 30, 2021 | 8:43 AM

मिरा भाईंदर शहराच्या स्थानिक आमदार गीता जैन यांच्या नावेही बनावट व्हॉट्सअॅप अकाऊण्ट तयार करण्यात आले आहे. फेसबुकचा आधार घेत शहरातील काही नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप करुन पैशांची मागणी करण्यात येत आहे.

आमदार गीता जैन यांच्या नावे फेक WhatsApp नंबर, स्थानिकांकडे पैशांची मागणी
Meera Bhainder MLA Geeta Jain
Follow us on

मिरा भाईंदर : मिरा भाईंदर शहराच्या स्थानिक आमदार गीता जैन (Geeta Jain) यांच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट खाते तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या फेक सोशल मीडिया अकाऊण्टवरुन चक्क पैशांची मागणी केली जात आहे. या संदर्भात नवघर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास सुरु आहे. (Mira Bhainder MLA Geeta Jain fake WhatsApp account demanding money)

नेमका प्रकार काय?

समाज माध्यमांवर बनावट खाते तयार करुन फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मिरा भाईंदर शहराच्या स्थानिक आमदार गीता जैन यांच्या नावेही बनावट व्हॉट्सअॅप अकाऊण्ट तयार करण्यात आले आहे. या व्हॉट्सअॅप नंबरवर आमदार गीता जैन यांच्या नावासह फोटो जोडण्यात आला आहे. फेसबुकचा आधार घेत शहरातील काही नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप करुन पैशांची मागणी करण्यात येत आहे.

फेक अकाऊण्टवरुन पैशांची मागणी

मिरा भाईंदर शहराच्या आमदार थेट आपल्याकडे पैसे मागत असल्यामुळे काही नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यामुळे काही जणांनी याची खात्री करण्यासाठी गीता जैन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी हे बनावट खाते असल्याची बाब सर्वांच्या निदर्शनास आली. याविषयी पोलिसात तक्रार केल्यानंतर नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहेत गीता जैन?

विधानसभा निवडणूक अपक्ष जिंकल्यावर गीता जैन यांनी भाजपला समर्थन दिलं होतं. मिरा भाईंदरची कमान भाजप आपल्या हातात देईल, असा विश्वास गीता जैन यांना होता. मात्र स्थानिक भाजप कुठल्याही कार्यक्रमात आमंत्रण देत नसल्याच्या कारणावरुन गीता जैन नाराज होत्या. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला.

संबंधित बातम्या :

मिरा भाईंदरमध्ये भाजपला धक्का, अपक्ष आमदार गीता जैन यांच्या हाती शिवबंधन

‘अर्जंट 12 हजारांची आवश्यकता आहे, Google Pay ने पैसे पाठवा’, जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन पैशांची मागणी

पिंपरी-चिंचवडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे फेसबुक अकाऊण्ट हॅक, मित्रांकडे पैशांची मागणी

हॉस्पिटलमध्ये आहे, दहा हजार पाठवा, पोलीस अधीक्षकांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंटवर पैशांची मागणी

(Mira Bhainder MLA Geeta Jain fake WhatsApp account demanding money)