नाशिकमध्ये महापालिका अधिकाऱ्याच्या नावे फेक फेसबुक प्रोफाईल, पैशांची मागणी

| Updated on: Jul 07, 2021 | 2:39 PM

नाशिकमध्येही ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या तक्रारी बघता सायबर सेल अलर्ट मोडवर आहे.

नाशिकमध्ये महापालिका अधिकाऱ्याच्या नावे फेक फेसबुक प्रोफाईल, पैशांची मागणी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नाशिक : नाशिकमध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी संतोष नागरगोजे यांचंही बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आलं होतं. नागरगोजे यांच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Nashik Cyber Crime Fake Facebook Profile of Municipal Corporation Officer)

विविध मार्गांनी नागरिकांना जाळ्यात अडकवून पैशांची मागणी केली जात असल्याच्या घटना हल्ली वाढल्या आहेत. नाशिकमध्येही ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या तक्रारी बघता सायबर सेल अलर्ट मोडवर आहे.

नाशिक पोलीस आयुक्तांचं आवाहन

नुकतंच, नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी संतोष नागरगोजे यांचं फेक फेसबुक प्रोफाईल तयार करुन त्यांच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा आरोप होत आहे. नागरिकांनी कोणत्याही भूलथापांवर विश्वास न ठेवता कोणालाही आपल्या बँकेच्या डिटेल्स देऊ नयेत, ओटीपी किंवा पासवर्ड शेअर करु नये, असं आवाहन नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केलं आहे.

मिरा भाईंदरच्या आमदाराच्या नावे पैशांची मागणी

मिरा भाईंदर शहराच्या स्थानिक आमदार गीता जैन (Geeta Jain) यांच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट खाते तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. गीता जैन यांच्या नावे बनावट व्हॉट्सअॅप अकाऊण्ट तयार करण्यात आले होते. या व्हॉट्सअॅप नंबरवर आमदार गीता जैन यांच्या नावासह फोटो जोडण्यात आला होता. फेसबुकचा आधार घेत शहरातील काही नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप करुन पैशांची मागणी करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

‘अर्जंट 12 हजारांची आवश्यकता आहे, Google Pay ने पैसे पाठवा’, जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन पैशांची मागणी

आमदार गीता जैन यांच्या नावे फेक WhatsApp नंबर, स्थानिकांकडे पैशांची मागणी

(Nashik Cyber Crime Fake Facebook Profile of Municipal Corporation Officer)