सांगली : बँक खात्याची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने बँक खाते क्रमांक आणि ओटीपी नंबर विचारून घेत एका अज्ञाताने चक्क रेल्वे पोलिसाला (Railway Police)चा ऑनलाईन गंडा (Online Fraud) घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तानाजी बच्चाराम पसारे असे लुटण्यात आलेल्या पोलिसाचे नाव असून ते मिरज रेल्वे पोलिस दलात कार्यरत आहेत. पसारे यांच्या खात्यावर 8 लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आले असून त्यापैकी 7 लाख 75 हजार रुपये काढून घेण्यात आले. पश्चिम बंगालमधील कोलकाता व दुर्गापूर येथील एटीएममधून पसारे यांच्या खात्यावरील काही रक्कम काढल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. (Online fraud of lakhs of rupees to Sangli Railway Police)
पसारे यांना 24 जानेवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. या व्यक्तीने “आपण बँकेतून बोलत आहे. तुमच्या बँक खात्याची केवायसी अपडेट न केल्यास पगाराचे खाते बंद होईल” असे सांगितले. वडील रुग्णालयात असल्याने पसारे यांनी गडबडीत बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगितला. त्याचा वापर करुन अज्ञाताने पसारे यांच्या बँक खात्याला जोडलेला त्यांचा मोबाईल क्रमांक बदलला. मोबाईल क्रमांक बदलल्याचा मेसेज आल्याने पसारे यांनी बँकेत जाऊन याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या खात्यावर ऑनलाईन 8 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढून त्यातील 7 लाख 75 हजार रुपये काढून घेतल्याचे कळले.
पसारे यांनी पुन्हा बँकेत जाऊन खात्यावरील व्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी कर्ज घेतले नसतानाही अज्ञाताने बँक खात्याला जोडलेल्या मोबाईल क्रमाकांचा गैरवापर करीत परस्पर वैयक्तिक कर्ज क्रेडीट करून हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. पश्चिम बंगालमधील कोलकाता व दुर्गापूर येथील एटीएममधून पसारे यांच्या खात्यावरील काही रक्कम काढल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पसारे यांनी पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली आहे. (Online fraud of lakhs of rupees to Sangli Railway Police)
इतर बातम्या