मुंबई : एमपीएसएसी परीक्षेद्वारे वन अधिकारी पदासाठी निवड झालेली दर्शना पवार हीची हत्या आरोपी राहुल हंडोरे याने अत्यंत नियोजित पद्धतीने थंड डोक्याने केल्याचे उघडकीस आले आहे. त्याने पुण्यातच तिची हत्या करण्याचा प्लान रचला होता आणि तेथून या कटाची सुरुवात झाल्याचे पुणे ग्रामीण पोलीसांच्या तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणात गुन्ह्यात वापरलेले हत्यार पुण्यातून ज्या दुकानातून विकत घेतले होते त्याचा पत्ताही पोलीसांनी शोधून काढला आहे.
राहुलला आता दर्शना क्लासवन ऑफिसर झाल्यावर आपल्याशी लग्न करणार नाही याची कुणकूण लागल्याने त्याने तिला राजी करण्यासाठी आणि ऐकली नाही तर तिला संपविण्यासाठी पुण्यातील एका दुकानातून कटर विकत घेतले होते. ते दुकान पोलीसांनी सापडले आहे.
एमपीएससी परीक्षेद्वारे क्लास वन पदावर निवड झालेल्या दर्शना पवार हीची राजगडावर हत्या करणारा तिचा मित्र राहुल हंडोरे याने तिची हत्या अत्यंत नियोजित पद्धतीने ठरवून केल्याचे उघड झाले आहे.
दर्शना हीच्या काकांच्या शेजारी राहुल हंडोरे रहायला होता. त्यामुळे ती काकांना भेटायला जायची त्यावेळी राहुलशी बोलायची. त्या दोघांनी मोठे अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले होते. तसेच पुण्यामध्ये एमपीएससी क्लासेससाठी दर्शना पवार रहायला आल्याचे त्याला कळल्यावर त्याने तिच्याशी संपर्क केला. त्यानंतर त्याने तिला एमपीएसएसीची पुस्तके विकत घेण्यास तसेच नोट्स तयार करण्यास मदत केली. त्यावेळी राहुल तिच्या प्रेमात पडला. परंतू हा राहुल हा एमपीएसएसीला नापास झाल्याने त्याने घरच्या परिस्थितीमुळे पार्ट टाईम फूड डिलिव्हरीचे काम करायला सुरुवात केली.
आपल्या मित्रासोबत 12 जूनला राजगड ट्रेकला दर्शना बाईकवरुन गेली. सकाळी साडे आठ वाजता राजगडच्या पायथ्याशी ते पोहचले. नंतर सती मल येथे पोहचल्यावर तेथे थकल्याने तेथे दोघे थांबले तेव्हा त्याने तिच्याशी असलेल्या प्रेमाचा आणि लग्नाचा विषय काढला, दर्शनाने त्याच्या प्रस्तावास नकार देत त्याच्याशी वादावादी केली. आणि त्याने तिच्या मानेवर कटरने वार केला. त्याने तिच्या गळ्यातून रक्ताची धार लागली. त्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तरीही त्याने वार करणे थांबविले नाही.
पोलिसांनी संशय आहे की राहुल याने राजगडला पोहचण्याआधीच त्याने दर्शनाच्या हत्येचा कट रचला होता. कारण त्याने पुण्यातूनच अत्यंत धारदार ब्लेड विकत घेतले होते. पोलीसांनी जेथून ब्लेड घेतले ते दुकानही शोधून काढले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांना संशय आहे दर्शनाची अचानक रागाच्या भरात हत्या झाली नसून सुनियोजित पद्धतीने तिला संपविले आहे.