पती परदेशात, पत्तीने घरी एकाच वेळी दोन्ही प्रियकरांना बोलावलं अन्… सासूने केली आयडियाची कल्पना!

| Updated on: May 01, 2023 | 10:49 PM

Crime News : नवरा परदेशी कामाला गेल्यावर बायकोने केलेल्या पराक्रमाने सर्व गाव हादरून गेलं आहे. सासूला त्या दिवशी जाग नसती आलं तर...

पती परदेशात, पत्तीने घरी एकाच वेळी दोन्ही प्रियकरांना बोलावलं अन्... सासूने केली आयडियाची कल्पना!
Follow us on

लखनऊ : पती नोकरीच्या शोधात परदेशात गेला होता. या काळात पत्नी सारखीच तिच्या माहेरच्या घरी येऊ लागली. दरम्यान, तिचे माहेरच्या दोन लोकांशी अनैतिक संबंध होते. महिलेनेही त्यांना घरी बोलावण्यास सुरुवात केली.  कहर म्हणजे एक दिवस तर तिने दोन्ही प्रियकरांना एकाचवेळी सासरच्या घरी बोलावलं. महिलेच्या सासूने तिघांनाही एका खोलीत नको त्या अवस्थेत अवस्थेत पाहिलं. त्यानंतर पोलिसांना बोलावून तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल पोलीस स्टेशन परिसरातील गावात ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या कुटुंबातील तरुणाचे लग्न शेजारील गावात राहणाऱ्या तरुणीशी झाले होते. लग्नानंतर तरुण नोकरीसाठी सौदी अरेबियाला गेला. पती परदेशात गेल्यामुळे पत्नीचे माहेरच्या घरी येणे-जाणे जास्त झालं. यादरम्यान तिचे माहेरच्या दोन लोकांशी अनैतिक संबंध झाले. महिला त्यांना भेटण्यासाठी सतत तिच्या माहेरच्या घरी जाऊ लागली.

महिलेने तिच्या दोन्ही प्रियकरांना सासरच्या मंडळींना भेटण्यासाठी बोलावलं. तिघे एका बंद खोलीत होते. तितक्यात सासू तिथे पोहोचली, आवाज आला आणि डोकावून पाहिल्यावर सासूला धक्काच बसला. त्यानंतर सासूने तिघांना खोलीला कुलूप लावत पोलिसांना बोलावलं. पोलीस गावात पोहोचले, पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला आणि सासूने सून आणि त्या दोन तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, सासूने तिच्या सूनेसह दोन्ही तरुणांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. आनंद कुमार गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांनी तरूणांसह सूनेला ताब्यात घेतलं आहे.