काय बया… म्हणे बॉयफ्रेंडशी बोलायचंय, रोखलं म्हणून बापाला पोलीस ठाणंच दाखवलं; कुठे घडली ही घटना ?

| Updated on: Jul 13, 2023 | 3:54 PM

बॉयफ्रेंडशी बोलण्यास मनाई केल्याने एका लेकीने तिच्या जन्मदात्या पित्याला पोलिसांकडेच नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

काय बया... म्हणे बॉयफ्रेंडशी बोलायचंय, रोखलं म्हणून बापाला पोलीस ठाणंच दाखवलं; कुठे घडली ही घटना ?
Follow us on

अयोध्या : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. काही लोकं प्रेमात (love) इतकी बुडतात त्यांना चांगल- वाईट, योग्य- अयोग्याची जाणच हरवून बसतात. नात्यांचाही काही मान ठेवत नाहीत ते. उत्तर प्रदेशातील अयोध्येतूनही काहीसं असंच समोर आलं आहे. जिथे एका मुलीने ‘प्रेमाच्या’ नादात स्वत:च्या जन्मदात्यालाच तुरुंगाची वारी घडवली. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पित्याला मुलीनेच तुरूंगात पाठवलं. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या पित्याविरोधातच एफआयआर (daughter lodged against father) दाखल केली.

सध्या हे प्रकरण शहरात चर्चेचा विषय बनलं आहे. खरंतर, पुरा जमुनिया मऊ गावातील एका मुलीने वडिलांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रियकराशी बोलल्याबद्दल वडिलांनी तिला बेदम मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप तिने पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीत केला आहे. मुलीच्या या आरोपावरून पोलिसांनी तात्काळ तिच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली.

जे पाहिजे ते करा

मंगळवारी रात्री ही तरूणी तिच्या प्रियकाराशी बोलत होती. तेवढ्यात तिचे वडील तेथे आले व त्यांनी तिला प्रियकराशी बोलण्यापासून रोखलं. हे ऐकून ती मुलगी संतापली व काहीही बडबड करू लागली. मी तर त्याच्याशी (प्रियकराशी) बोलणारंच , तुम्हाला जे वाट्टेल ते करा अशा शब्दांत ती वडीलांशी बोलू लागली. त्यानंतर तिने तिच्या प्रियकराला बोलावलं आणि त्याच्यासोबत पोलिस स्थानकात जाऊन वडिलांविरोधात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी समजावूनही तिने काही ऐकलंच नाही

ते तुढे बाबा आहेत, त्यांच्याशी असं वागू नकोस, अशा शब्दांत पोलिसांनी त्या तरूणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र डोक्यावर प्रेमाचं भूत बसलेल्या त्या तरूणीने कोणाचंच ऐकलं नाही आणि कायदेशीर कारवाई करण्याबाबत ती ठाम राहिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात कलम 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला व त्यांना तुरुंगात पाठवले. या प्रकरणाची शहरात सध्या बरीच चर्चा सुरू असून वडिलांनाच तुरूगांची हवा खायला लावणाऱ्या मुलीबद्दल सगळेच बोलताना दिसत आहेत.