मुंबई : पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून एक 51 वर्षांची महिला आपल्या पेक्षा वयाने कमी असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाच हजार किलोमीटरचा प्रवास करत गेली होती.मात्र, तिच्यासोबत अत्यंत दुर्दवी घटना घडली. 37 वर्षीय प्रियकराने तिची थेट हत्याच केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन वेगवेगळ्या देशाचे प्रियकर आणि प्रेयसी असल्यानं संपूर्ण जगभरात या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर यापूर्वी मानवी अवयवांच्या तस्करीचे आरोप आहेत. यामध्ये दिल्लीतील येथील श्रद्धा वालकर घटनेप्रमाणेच त्याने प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करून फेकून दिले आहे. त्यामुळे निर्घृण हत्येवरून संशयित आरोपीवर कठोर कारवाई व्हायला हवी अशा विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकरी व्यक्त करत आहे.
मेक्सिको मध्ये राहणारी 51 वर्षाची ब्लैंका अरेलानो ही महिला 37 वर्षाच्या पेरू येथील जुआन विलाफूएर्टेच्या ऑनलाईन संपर्कात होती. ऑनलाईन संपर्कात असल्याने त्यांच्यामध्ये दररोज संवाद होत होता, त्यामुळे सुरुवातीला मैत्री आणि नंतर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले होते.
दिवसेंदिवस होणाऱ्या संवादात ब्लैंका अरेलानो ही अथांग प्रेमात बुडाली होती, याच दरम्यान मेक्सिको येथील ब्लैंका अरेलानो ही जुआन विलाफूएर्टेला भेटायला गेली होती.
जुआन विलाफूएर्टे हा पेरू या देशात राहतो, तिच्या पासून त्याचे अंतर जवळपास पाच हजार किलोमीटर इतके होते, तरीही प्रेयसी प्रियकराला भेटायला गेली होती.
तिथे गेल्यांनतर ब्लैंका अरेलानो ही जुआन विलाफूएर्टे सोबत राहत होती, 7 नोव्हेंबरला तिने घरच्या व्यक्तींना कॉल करून मी खुश असल्याचे सांगत माझं जुआनवर प्रेम झाल्याचे देखील सांगितले होते.
मात्र, गेले अनेक दिवस उलटून गेले ब्लैंका अरेलानो हिच्याशी तिच्या पालकांचा संपर्क होत नसल्याने त्यांनी याबाबत पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दिली होती, त्यावरून पोलिसांनी तपास सुरु करत ते पेरू येथे पोहचले होते.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी तपास सुरु केला होता, त्यात अरेलानो हिच्या शरीराचे तुकडे आढळून आले त्यात तिच्या बोटात असलेल्या रिंगवरून हे शरीर तिचेच असल्याचे स्पष्ट झाले, पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून शरीराचे तुकडे जमा केले होते.
समुद्र किनारी हे सगळे तुकडे आढळून आल्यानं पोलिसांनी चौकशीसाठी ब्लैंका अरेलानो चा प्रियकर जुआन विलाफूएर्टेला अटक केली असून चौकशी केली जात आहे.