बेंगलुरु : क्राईमच्या घटना (Crime News) रोज समोर येत आहेत. त्यापैकी काही घटना अशा असतात सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. रेल्वेच्या (Railway) कचरा टाकण्याच्या एका ड्रममध्ये महिलेचा मृतदेह (woman dead body) सापडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. ज्यावेळी ही घटना कचरा कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. त्यावेळी प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलिस सीसीटिव्ही तपासण्याचं काम करीत आहेत.
बेंगलुरु येथील यशवंतपुर रेल्वे स्टेशनच्या हद्दीत साफसफाई करणाऱ्या कर्मचारी बुधवारी सफाई करीत असताना कुचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. कर्मचाऱ्याने ही गोष्ट तात्काळ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पोलिसांना हत्या झाली असावी असा संशय आहे. त्यामुळे पोलिस सीसीटिव्हीची तपासणी करुन चौकशी करीत आहेत. त्याचबरोबर त्या परिसरात अजून काही संशयास्पद सापडते का ? हे सुध्दा पाहत आहेत. २० ते २५ वर्षाच्या महिलेचा मृतदेह असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
कुसुमा हरिप्रसाद या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कचऱ्याच्या ड्रममध्ये मृतदेह सापडला आहे. या प्रकरणाची आम्ही कसून चौकशी करीत आहे.