मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : आपल्या मदतीसाठी कायम तत्पर असलेले दोस्त हे आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. प्रत्येक प्रसंगी खंबीरपणे पाठिशी उभे असणारे मित्र सर्वांनाच मिळतात असे नाही. म्हणूनच असे दोस्त सर्वांसाठी स्पेशल असतात आणि दोस्तीचं (friendship) हे नातंही वेगळं असतं. पण याच मित्राने आपला विश्वासघात केला तर ? मित्रावर विश्वास ठेवून त्याच्या घरी रहायला जाणं, एका तरूणीला फारच महागात पडलं. दिल्लीहून आलेल्या (delhi based woman in mumbai) या तरूणीने मित्राच्या घरी रहायचा निर्णय तर घेतला पण त्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्यंच बदलून गेलं.तिच्या मित्रानेच तिचा विश्वासघात करत दगा दिल्याने ती कोलमडून गेली.
दिल्लीहून मुंबई फिरायला आली होती..
पीडित तरूणी (वय 28) ही दिल्लीची रहिवासी असून ती एक फॅशन डिझायनर आहे. तिला मुंबई बघायची, फिरायची खूप इच्छा होती. म्हणून शहर फिरण्याच्या उद्देशाने ती मुंबईत आली खरी, पण इथे आल्यावर काय होणार आहे, याची तुला जराही कल्पना नव्हती. पहिल्यांदाच मुंबईत आल्यानंतर ती मुंबईतील तिच्या मित्राच्या घरी थांबली होती. मात्र तिथे तिच्यासोबत जे घडलं ते भयानक होतं. मित्राच्या मनात तिच्याबद्दल काय भावना आहेत हे तिला आधी कळलं असंत तर तिने तो निर्णय घेतलाच नसता.
आधी रहायला जागा दिली अन् नंतर…
पीडित तरूणीचा हा मित्र एक व्यावासायिक असून तो खार येथे राहतो. तरूणी ही त्याच्या घरी रहात होती. तेव्हा तिच्या मित्राने तिच्यावर बलात्कार आणि अत्याचार केला. आरोपीने तिला मारहाणही केली. त्यानंत पीडितेने तातडीने पोलिसांत धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी, आरोपीविरोधात आयपीसी कलम 376 (बलात्कार), 354 अ (लैंगिक छळ), 354 बी , कलम 323 नोंदवलेआणि कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दुष्कृत्यानंतर आरोपी फरार
हे निर्घृण कृत्य आणि अत्याचार करणारा आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा कायदेशीर तपास सुरू आहे. मात्र, पीडितेची आरोपीशी ओळख कशी झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.