Delhi Atm robbery : दिल्लीत ATM फुटेना म्हणून चक्क उपसूनच नेलं, किती लाखाला लुटले?

| Updated on: Apr 01, 2022 | 8:10 PM

दिल्लीतल्या चोरांनी एक धाडसी चोरी केलीय. दिल्लीतील अली विहारमध्ये चोरीची घटना समोर आली आहे, ज्यामध्ये चोरांनी एटीएममध्ये घुसून संपूर्ण मशीन उखडून (ATM Robbery) नेलं. मशिनमध्ये जवळपास 30 लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती समोर आली आहे.

Delhi Atm robbery : दिल्लीत ATM फुटेना म्हणून चक्क उपसूनच नेलं, किती लाखाला लुटले?
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतली गुन्हेगारी (Delhi Crime) संपूर्ण देशाला परिचित आहे. दिल्लीतले चोरही भयंकर खतरनाक आहेत. आताही दिल्लीतल्या चोरांनी एक धाडसी चोरी केलीय. दिल्लीतील अली विहारमध्ये चोरीची घटना समोर आली आहे, ज्यामध्ये चोरांनी एटीएममध्ये घुसून संपूर्ण मशीन उखडून (ATM Robbery) नेलं. मशिनमध्ये जवळपास 30 लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या परिसरातली पोलिसांची गस्तही (Delhi Police) नीट होत नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा राजधानीतल्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजधानी दिल्लीत सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिल्लीतली सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेनवरून नेहमीच ओरड असते. हे अनेकदा संपूर्ण देशाने पाहिले आहे. आता पुन्हा तसाच प्रकार घडल्याने दिल्ली पोलिसांसमोर हे थांवण्याचं आवाहन असणार आहे.

दिल्ली पोलिसांवर पुन्हा जोरदार टीका

हा चोरीचा भयानक प्रकार समोर आल्यानंतर आता पोलीस प्रशासनं खडबडून जागे झाले आहे. पोलिसांनी वेगाने या चोरांचा शोध सुरू केला आहे. जैतपूरच्या अली विहार भागात फोडलेले हे एटीएम स्टेट बँकेचे असल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्यांनी येथून संपूर्ण मशीन पळवून नेले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. त्याचवेळी चोरट्यांनी संपूर्ण मशीन पळवून नेल्याची घटना आमच्या परिसरात पहिल्यांदाच घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. गुन्हेगारांवर दिल्ली पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांवर पुन्हा जोरदार टीका होऊ लागली आहे.

या परिसरात नेहमीच चोरीच्या घटना

या परिसरात दररोज चोरीच्या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलीस परिसरात नीट गस्त घालत नसल्याचा मोठा आरोप लोकांनी दिल्ली पोलिसांवर केला आहे. त्यामुळे चोरी, दरोडे, स्नॅचिंग अशा घटना घडत आहेत. मात्र, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. एटीएममध्ये जवळपास 30 लाख रुपये रोख असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बँकेकडूनही पोलिसांना तगादा लावला जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तपासाची सुत्रं वेगाने फिरवायला सुरूवात गेली आहे. काही तासातच पोलिसांच्या हाती काही ठोस माहिती लाण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्गात बैलांची झुंज प्रकरणी 12 जणांवर गुन्हा; मुंबईच्या माजी महापौरांचा समावेश; ‘पाल’ संस्थेने केली तक्रार

Pune crime : पुण्यात पुन्हा तलवारी जप्त, कुरिअरद्वारे कोणत्या टोळीने मागवल्या तलवारी?

Pm Modi Death Threat : पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलमध्ये स्लीपर सेल, RDX तयार असल्याचा उल्लेख