दिल्ली : दिल्लीतील श्रद्धा वालकर प्रमाणेच आणखी एक हत्याकांड सोमवारी उघडकीस आलं. आईने मुलाच्या मदतीने पतीची हत्या केली. त्याच्यानंतर पतीच्या शरीराचे तुकडे केले. हे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले आणि नंतर श्रद्धा हत्याकांड प्रमाणेच त्याच्या मृतदेहाची एक एक करुन विल्हेवाट लावली. दरम्यान, या हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल 500 फ्रिज तपासले होतेस अशी माहिती समोर आलीय. एका संकेतस्थळाने दिलेल्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करत या हत्याकांडप्रकरणी मोठा खुलासा केलाय. आता हत्याप्रकरणी दोघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात. तब्बल 5 महिन्याच्या अथक प्रयत्नांतर या हत्याकांडाचं गूढ उकललंय.
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी घरोघरी जाऊन तपास केला होता. जून महिन्यात पोलिसांनी एका मृतदेहाचे तुकडे आढळून आले होते. हा मृतदेह कुणाचा आहे, याचा तपास करण्यासाठी ही हत्या कुणी केली, इथपर्यंतच्या अनेक प्रश्नांची उकल पोलिसांना करायची होती.
दिल्लीतील रामलीला मैदानात मृतदेह तुकडे आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांना हे तुकडे अंजन नावाच्या व्यक्तीचे असल्याचं उघडकीस आलं. ही व्यक्ती पाच महिन्यांपासून बेपत्ता होती आणि तिच्याबाबत कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला होता.
रामलीला मैदानासमोर असलेल्या ब्लॉक-20 भागात जाऊन प्रत्येक घरात पोलिसांनी चौकशी केली. तुमच्या घरात फ्रिज आहे का? इथपासून पोलिसांच्या प्रश्नांना सुरुवात व्हायची. घरातील अतिरीक्त फ्रिजचा शोध घेण्यापासून ते फ्रिजमध्ये नेमकं काय आहे, हे तपासण्यापर्यंत पोलिसांनी मोहीम राबवली होती.
प्रयत्नांनी शर्थ करत पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली. अनेक सीसीटीव्ही फुटेजची देखील पाहणी केली गेली. तब्बल 500 घरांमध्ये जाऊन चौकशी पोलिसांनी केली होती. इतकंच काय तर स्थानिकांना परिसरात येण्या-जाण्याबाबतही वारंवार विचारणा केली जात असल्याची माहिती समोर आलीय.
श्रद्धा हत्याकांड प्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत होते. त्यावेळी आढळलेले मृतदेहाचे तुकडे श्रद्धाचे नसून एका पुरुषाचे असल्याचं स्पष्ट झालं. तेव्हापासून पोलिसांनी आपला तपास पुन्हा वेगाने सुरु केला आणि हे तुकडे अंजन नावाच्या व्यक्तीचे असल्याचं उघड झालं.
आता या हत्येप्रकरणी अंजनीच पत्नी पूनम आणि मुलगा दीपक यांना पोलिसांनी अटक केलीय. त्यांनीह हत्येची कबुली दिलाय. आरोपींनी पोलिसांनी दिलेल्या कबुलीत अंजनवर संशय असल्याच्या कारणावरुन त्याची हत्या केल्याचं म्हटलंय.
मुलीच्या पत्नीवर आणि पोटच्या पोरीवर वाईट नजर ठेवून असलेल्या अंजनच्या मृत्यूचा कट रचल्याचं आरोपी पत्नी आणि मुलानं म्हटलंय. धक्कादायक बाब म्हणजे पूनम ही अंजनची दुसरी बायको होती. तर अंजन हा पूनमचा तिसरा नवरा होता. हे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजलीय.