दिल्ली : राजधानी दिल्लीत मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. द्वारका इथं एका विद्यार्थीवर ACID हल्ला करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे. ACID हल्ल्यामध्ये विद्यार्थीनी गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ACID हल्ला ज्या तरुणाने केला, तो या मुलीच्या ओळखीचाच मुलगा होता, अशी माहिती समोर आली आहे. जखमी मुलगी बारावीची विद्यार्थीनी असून या ACID हल्ल्यामागे नेमकं कारण काय आहे, हे समोर आलेलं नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन घेतली असून ज्या रुग्णालयात पीडित मुलीवर उपचार सुरु आहेत, तिथंही पोलिसांचं एक पथक तैनात करण्यात आलं आहे. अधिक तपास केला जातोय.
दिल्ली के द्वारका मोड़ इलाके में एक स्कूली छात्रा पर बाइक सवार दो लड़कों ने तेजाब फेंक दिया. pic.twitter.com/X5ZIXGEsVS
— Asheesh Kumar Mishra (@Asheesh17604450) December 14, 2022
बुधवारी सकाळी द्वारका परिसरात ACID हल्ल्याची ही घटना घडल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. जखमी मुलीला सफदरजंग येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. तसंच या मुलीचे पालकही ACID हल्ल्याच्या घटनेनं प्रचंड धास्तावले आहेत.
A boy has thrown acid on a schoolgirl in Delhi’s Dwarka district area. The incident took place at around 9 am. The girl has been referred to Safdarjung Hospital. Delhi police officers are also reaching the Hospital: Delhi Police
— ANI (@ANI) December 14, 2022
दिल्ली पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जातो आहे. सीसीटीव्ही फुटेज, इतर प्रत्यक्षदर्शी, मुलीचे पालक आणि स्वतः पीडिता यांचेही जबाब पोलिसांकडून नोंदवून घेतले जाणार आहे. त्यानंतर या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे, हा हल्ला का करण्यात आला, या प्रश्नांची उत्तर समोर येतील. या हल्ल्यात जखमी झालेली मुलगी प्रचंड घाबरी असून तिला सावरण्याचं आव्हानंही तिच्या कुटुंबीयांसमोर उभं ठाकलं आहे.
The girl is under treatment. As per the preliminary report, she is stable. Doctors will be able to tell better: Delhi Police
— ANI (@ANI) December 14, 2022
हा हल्ला करण्यात आला तेव्हा पीडित मुलीची लहान बहीण देखील तिच्या सोबत होती. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेत चौकशी सुरु झाले. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासलं असून सध्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.