मुलगी म्हणाली ‘भाऊ पाहिजे, राखी बांधायची आहे…., बाबाने रस्त्यावर झोपलेलं बाळ आईच्या कुशीतून चोरुन आणले

| Updated on: Aug 26, 2023 | 11:47 AM

VIRAL NEWS : सध्या एका घटनेची सोशल मीडियावर अधिक चर्चा सुरु आहे. एका व्यक्तीने आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क रस्त्यावरील बाळ चोरलं. हे बाळ दिव्यांग असलेल्या आईच्या कुशीतून चोरलं होतं.

मुलगी म्हणाली भाऊ पाहिजे, राखी बांधायची आहे…., बाबाने रस्त्यावर झोपलेलं बाळ आईच्या कुशीतून चोरुन आणले
baby boy
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिल्ली : आपलं आयुष्य कधी कोणत्या (viral news) रुळावर येईल, हे कोणीच सांगू शकत नाही असं नेहमी आपल्याला घरातले किंवा मित्रमंडळ सांगतात. कधी कधी एखादं सुख मिळवण्यासाठी आपल्याला एखादा गुन्हा करावा लागतो. असाचं प्रकार काल दिल्लीत (Delhi news in marathi) घडला आहे. देशाच्या राजधानीत आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाने टोकाचा निर्णय घेतला आहे. संजय गुप्ता (41) आणि अनीता गुप्ता (36) असं पती पत्नीचं नाव आहे. त्यांनी घरातील खरी गोष्ट ज्यावेळी पोलिसांना (delhi police) सांगितली. त्यावेळी पोलिस सुध्दा एकदम हतबल झाले होते.

आरोपीच्या मुलाचा एक वर्षापुर्वी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मुलीने अशी मागणी केली की, बापाने टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या मुलीने यावर्षी रक्षाबंधनाला मला भाऊ पाहिजे अशी अट ठेवली. त्या मुलीची मागणी ऐकून तिच्या बापाने घरातील बाईक काढली आणि अर्ध्या रात्री दिल्लीच्या रस्त्यावर फिरु लागला.

दिव्यांग महिलेच्या मुलाची चोरी केली

राजधानीतील काही रस्त्यावर आरोपी फिरला, त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दिव्यांग मुलाची चोरी केली. मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. त्या मुलाला ज्यावेळी घरी आणलं त्यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करण्यास सुरुवात केली. ज्या महिलेचं मुलं चोरलं आहे, त्या महिलेला किती वेदना झाल्या झाल्या असतील हे तुम्ही समजू शकता.

हे सुद्धा वाचा

४०० सीसीटिव्ही शोधून काढले

छत्ता रेल चौक परिसरात रस्त्याच्या कडेला राहणारी महिला आपल्या मुलांसोबत झोपली होती. मुलगा चोरी केल्याचं तिला माहित नव्हतं. ज्यावेळी मुलगा कुठेचं दिसेना झालाय, त्यावेळी ती सुध्दा चांगलीचं बिथरली. ही घटना रात्री तीन वाचता घडली आहे. ज्यावेळी हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये गेलं त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी साधारण ४०० सीसीटिव्ही शोधून काढले. ज्यावेळी पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी दोन लोकं फिरत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी त्या बाईकचा पाठलाग केला.

पोलिसांनी त्या बाईकचा पाठलाग केला. त्यावेळी ती बाईक लोक नायक जयप्रकाश रुग्णालयात पोहोचली होती. त्यावेळी त्या गाडीचा नंबर सीसीटिव्हीत पाहिला, ती बाईक आरोपीच्या नावावर होती. त्यावेळी पोलिसांनी आरोपीची घरी जाऊन चौकशी केली. तिथं मुलगा आरामात झोपला होता. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु केली आहे.