नवी दिल्ली : हिट एन्ड रन (Hit and Run) हा शब्द सलमान खानच्या (Salman Khan) हिट एन्ड रन केसनंतर सगळ्याच चर्चेत आला. हे खरं असलं, तरी हिट एन्ड रस केलच्या काही थांबल्या नाहीत. आजही हिट एन्ड रनचं धगधगतं वास्तव आपल्या सगळ्यांच्या समोर सातत्यानं समोर येत राहतं. आताही एक घटना समोर आली आहे. घटना राजधानी दिल्लीतली आहे. एक भरधाव स्कॉर्पियो (Mahindra Scorpio) बाईक रायडरला कट मारत धडक देते. जाणिवपूर्वक ही धडक दिली जाते. यानंतर बाईक स्वाराचा तोल जातो. तो बाईकसह रस्त्यावर कोसळतो. मागून येणाऱ्या दुसऱ्या बाईक रायडरच्या हेल्मेटवर लावलेल्या कॅमेऱ्यात ही सगळी घटना कैद झालीय. रविवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झालाय. स्कॉर्पिओ चालकावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरतेय.
स्कॉर्पिओ चालकासोबत आधी बाचाबाची झाली. त्यानंतर स्कॉर्पिओवाला बाईक रायडरला गाडीची ठोकतो. यात बाईकचा बॅलन्स जाऊन बाईक थेट रस्त्याच्या एका बाजूच्या डिव्हायरला धडकते. बाईक चालकही बाईकसह फरफटत जातो. ही घनटा घडली आहे. दिल्लीच्या अर्जुनगड या मेट्रो स्टेशनच्या खाली. अनुराग अय्यर नावाच्या एका इसमान हा व्हिडीओ शेअर केला असून स्कॉर्पिओ चालकानं पळ काढल्याचंही या व्हिडीओत दिसून आलंय
फरार स्कॉर्पिओ चालकावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पीएमओइंडिया, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नवी दिल्लीचे डीसीपी यांनाही या ट्वीटमध्ये टॅग करण्यात आलंय.
@PMOIndia @ArvindKejriwal @DCPNewDelhi
Please help us , the Scorpio Car driver almost killed a few of our riders and threatened to kill us by crushing us under the car.
This is not what we vote for or pay taxes for
no one was severely injured
Gears respect riders pic.twitter.com/rcZIZvP7q4— ANURAG R IYER (@anuragiyer) June 5, 2022
सुदैवानं यातून दुचाकीस्वार बालंबाल बचावलाय. सुरक्षेसाठी घाललेलं हेल्मेट, नी कॅप आणि हॅन्ड ग्लोव्ह्समुळे बाईक रायडरचा जीव वाचलाय. पण त्यांला गंभीर दुखापत झाली.
Bruised
Injured
Withering#bikerlife #Accidents #rideback #GearshiftDon’t worry. On a break for a week
( Posted on behalf of Anurag by family )He is fine. 2 dislocated bones, several bruises, but is recovering pic.twitter.com/BHkKeF7XNr
— ANURAG R IYER (@anuragiyer) May 22, 2022
हिट एन्ड रन केसचा पीडित असलेल्या श्रेयांशने या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. एकूण आठ ते दहा जण मिळून गुरुग्रामहून दिल्लीत येत होते. त्यावेळी ही घटना घडली. श्रेयांशच्या म्हणण्यानुसार, स्कॉर्पिओचालक बेदरकारपणे वाहन चालवत होता. त्यामुळे त्याला बाईक स्वारांनी दम दिला. त्यांना शिस्तीत वाहन चालवायला सांगितलं. यावरुन वाद झाला.
वाद टोकाला गेला आणि त्यातूनच धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं. बाईकस्वार जेव्हा पुढे गेले, तेव्हा मागून भरधाव वेगानं त्याला ओव्हरटेक करताना स्कॉर्पिओचालकानं बाईक स्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वाराच्या हाताला, गुडघ्याला आणि कोपऱ्यावर गंभीरीत्या खरचटलंय. आता याप्रकरणी पोलीस स्कॉर्पिओ चालकावर काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचंय.