तो चाकूने वार करत होता… तिने तडफडत जीव सोडला अन् लोक पाहत राहिले… डोकं बधीर करणारा प्रकार; या घटनेने सर्वच हादरले

| Updated on: May 29, 2023 | 2:33 PM

Delhi Girl Muder News : दिल्लीत अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो तरूण भररस्त्यात तिच्यावर चाकूने वार करत असताना आजूबाजूच्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.

तो चाकूने वार करत होता... तिने तडफडत जीव सोडला अन् लोक पाहत राहिले... डोकं बधीर करणारा प्रकार; या घटनेने सर्वच हादरले
दिल्लीत तरूणाने अल्पवयीन मुलीची केली हत्या
Follow us on

दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत (delhi) पुन्हा एकदा एक खळबळजनक घटना घडली आहे. दिल्लीतील एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर चाकूने (minor girl killed with knife) सपासप वार करून तिची हत्या केली. एवढेच नव्हे तर त्याने तिला दगडानेही ठेचले. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना शाहबाद डेअरी परिसरात घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर जिल्ह्यातील शाहबाद डेअरी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. साहिलअसे आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपी साहिल आणि तरुणीमध्ये भांडण झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यानंतर आरोपी साहिलने तरुणीला रस्त्यात थांबवल, त्यांच्यात काही वाद झाला आणि काही सेकंदानंतरच आरोपी साहिलने तरुणीवर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली.

आरोपी साहिल सतत मुलीवर चाकूने वार करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार भररस्त्यात घडला, लोकं त्यावेळी आजबाजून ये-जा करत होते, बघतही होते. पण कोणीही त्याला थांबवण्याचा अथवा त्या मुलीला वाचवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. आरोपी साहिलने त्या अल्पवयीन मुलीवर 30 हून अधिक वेळा चाकूने सपासप वार केले. एवढेच नव्हे तर त्याने दगडाने तिचं डोकही ठेचल. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. जखमी मुलीला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अल्पवयीन मुलीच्या हत्येची माहिती खबऱ्याने बीट कर्मचाऱ्यांना दिली. त्यासोबतच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस तपासात अल्पवयीन मुलीची ओळख पटली आहे. मृत मुलगी ही ई-36 जेजे कॉलनी येथील रहिवासी होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आणि अल्पवयीन मुलीचे नाते होते, मात्र रविवारी दोघांमध्ये वाद झाला. मुलगी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात असताना साहिलने तिला रस्त्यात अडवले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपी साहिलने तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. एवढय़ावरही त्याचे समाधान न झाल्याने आरोपीने तिला दगडाने ठेचले आणि लाथही मारली.