प्रियकराचा भररस्त्यात प्रेयसीवर वार, टॅक्सीचालकाच्या धाडसामुळे वाचला तिचा जीव

| Updated on: Oct 13, 2023 | 3:56 PM

आरोपीने त्या तरूणीला आधीही त्रास दिला होती, धमकीही दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी तिने आधीही तक्रार केली होती.

प्रियकराचा भररस्त्यात प्रेयसीवर वार, टॅक्सीचालकाच्या धाडसामुळे वाचला तिचा जीव
Follow us on

नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : राजधानीत सतत गुन्हे घडतच असतात. कधी मोठ्या ज्वेलरी शॉपवर दरोडा तर कधी लुटारू टॅक्सी घेऊन पळून जातात. या वाढत्या गुन्ह्यांमुळे दिल्लीकर (delhi) भलतेच धास्तावले आहेत. त्यातच आता आणखी एक हैराण करणारा प्रसंग घडला आहे. एका युवकाने भररस्त्यातच त्याच्या प्रेयसीवर निर्घृणपणे चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केला. साकेतमध्ये हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. २३ वर्षांची पीडित तरूणी टॅक्सीमध्ये बसायला जात होती, तेवढ्यात आरोपी तरूणाने तिच्यावर वार केला. पण नशिबाने तो टॅक्सीचालक तिच्या मदतीसाठी धावला आणि त्याने आरोपी तरूणाला पकडून ठेवले.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये तरूणी मदतीची मागणी करताना दिसत आहे. तिच्या आणि आरोपीच्या कपड्यांवरही रक्ताचे डाग होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला बेड्या ठोकत अटक केली. गौरव पाल असे आरोपीचे नाव असून तो गाजियाबादचा रहवासी आहे. गुडगाव येथे एका कंपनीत काम करतो

दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतं कपल

याप्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती दिली. सकाळी ६.३० च्या सुमारास आम्हाला लाडो सराय येथून एक पीसीआक कॉल आला. एका तरूणीवर एक तरूणाने चाकूने वार केल्याचे आम्हाला समजले. ती तेथे जखमी अवस्थे पडल्याचे कॉलवर बोलणाऱ्याने सांगितले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

पीडित तरूणी आणि आरोपी हे दोघं दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, अशी माहिती मिळाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती तरूणी आरोपीकडे दुर्लक्ष करत होती, तय्ला टाळत होती. तिला त्याच्या सोबतचं नातं संपवायचं होतं. यामुळे आकोपी गौरव खूप नाराजा झाला, चिडला होता. घटनेच्या दिवशी त्याने तरूणीला घराजवळ भेटायलं बोलावलं, पण तिथेही त्यांच्यात
वाद झाले. काही वेळानंतप पीडितेन तिथून जाण्यासाठी कॅब बूक केली. ती कॅबमध्ये बसणारच होती तेवढ्यात आरोपी गौरवने चाकू काढून तिच्यावर वार केला.

ड्रायव्हर आला धावून

तरूणाचे हे कृत्य पाहून कॅबचालक खाली उतरला. त्याने आरोपीला पकडून ठेवल्याने तरूणीचे प्राण वाचले. सध्या आरोपी पाल याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. पीडित तरूणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आधीपण दिला होता त्रास

आरोपी गौरवने त्या तरूणीला आधीही त्रास दिला होती, धमकीही दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. तिने याबाबत पीसीआर कॉल करत तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तिच्या घरी जाऊन चौकशी केली. मात्र तिने पुढे त्याच्याविरोधात कारवाई करण्यास नकार दिल्याने, पोलिसांनी त्याच्या विरोधात काहीच ॲक्शन घेतली नाही.