कॉल्स आले, बँकेशी सातत्याने व्यवहार, व्हॅक्सीन सर्टिफिकेटही… मरणानंतरही दोन वर्ष घरच्यांशी कशी बोलत होती मोना ?

| Updated on: Oct 02, 2023 | 1:08 PM

कायद्याचा रक्षक असलेल्या पोलिसानेच कायदा तोडत गुन्हा केला. आणि सतत दोन वर्ष गुन्हा लपवत राहिला. त्यासाठी त्याने नातेवाईकांच्या मदतीने एक भयानक कट रचला आणि पीडितेच्या कुटु्ंबियांची दिशाभूल करत राहिला. अखेर त्याच्या या गुन्ह्याचा पर्दाफाश कसा झाला.

कॉल्स आले, बँकेशी सातत्याने व्यवहार, व्हॅक्सीन सर्टिफिकेटही... मरणानंतरही दोन वर्ष घरच्यांशी कशी बोलत होती मोना ?
Follow us on

नवी दिल्ली | 2 ऑक्टोबर 2023 : देशाची राजधानी दिल्लीमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. कायद्याचा रक्षक असलेल्या एका इसमानेच कायदा मोडल्याचे समोर आले. दिल्ली पोलीसातील एका कॉन्स्टेबलने कथितरित्या त्याच्या एका माजी महिला सहकाऱ्याचा खून (murder) केला. एवढंच नव्हे तर पुढे सतत दोन वर्ष तो पोलिसांशी आणि पीडितेच्या कुटुंबियांशी खोटं बोलत होता. तुमची मुलगी जिवंत आहे, अशी खात्री तो तिच्या कुटुंबियाना सतत देत होता. त्यांचा विश्वास बसावा यासाठी त्याने अनेकवेळा तिच्याशी बोलणंही करून दिलं.

अखेर पोलिसांच्या कठोर तपासानंतर त्याचं बिंग फुटलं आणि खुनाचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबलसह त्याच्या दोन साथीदारांनाही अटक केली आहे. या खुनाचा अधिक तपास सुरू असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. खुनाच्या या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे.

या कारणामुळे केला खून

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबलपदी कार्यरत असलेल्या सुरेंद्र राणा (वय 42) याचे मोना नावाच्या तरूणीवर प्रेम होते. 2014 साली ती दिल्ली पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून जॉईन झाली. दोघेही पीसीआरमध्ये तैनात होते. राणा याने तिच्यासमोर प्रेमाची कबुली दिली, मात्र मोनाने काहीच इंटरेस्ट दाखवला नाही आणि त्याला नकार दिला. दरम्यान, मोनाला यूपी पोलिसात सब-इन्स्पेक्टरची नोकरी मिळाली, त्यानंतर तिने नोकरी सोडली आणि दिल्लीतून सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच यूपीएससीची तयारी सुरू केली.

गळा दाबून केली हत्या , मृतदेह नाल्यात फेकला

मोनाने ती नोकरी सोडल्यानंतर राणा तिच्यावर नजर ठेऊन होता. मोनाला हे समजल्यानंतर तिने खूप विरोध केला. 8 सप्टेंबर 2021 रोजी त्या दोघांचे याच मुद्यावरून भांडण झाले. त्यानंतर राणा हा मोनाला एका निर्जन जागी घेऊन गेला आणि गळा दाबून तिची हत्या केली. राणाने त्याचा मेव्हणा रविन (वय 26) आणि राजपाल (वय 33) यांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि गुन्हाही लपवला. मृतदेह लपवण्यासाठी त्यानी त्यावर दगडही टाकले. त्यानंतर आपलाच गुन्हा लपवण्यासाठी त्याने एक योजना आखली आणि मोनाच्या कुटुंबियांना फोन करून ती कोण्या अरविंदसोबत पळून गेल्याचे खोटंच सांगितलं.

तिच्या नावे व्हॅक्सीन सर्टिफिकेटही बनवलं

मोनाचा हितचिंतक बनून तो तिच्या कुटुंबियांच्या सतत संपर्कात होता आणि तिचा शोध घेण्याचं नाटक करून लागला. तो अनेकवेळा तिच्या कुटुंबियांसोबत पोलिसांतही गेला. मोना जिवंत आहे हे कुटुंबियांना दाखवण्यासाठी राणाने एक प्लान रचला. दुसऱ्या एका महिलेला घेऊन तो कोरोनाचे व्हॅक्सीन लावायला गेला, पण सर्टिफिकेट मात्र त्याने मोनाच्या नावाचं घेतलं. मोना जिवंत आहे हेच दाखवण्यासाठी त्याने हा कारनामा केला, एवढंच नव्हे तर तो तिच्या बँक अकाऊंटमधूनही व्यवहार केले. तिच सिमकार्डही वापरलं. मोना कुठे आहे ते आपल्याला माहीत आहे असं सांगत तो तिच्या कुटुंबियांसोबत चार-पाच राज्यांतील अनेक ठिकाणीही जाऊन आला.

ऑडिओ एडिट करून पाठवायचा

एवढं सगळं करूनही राणाचं मन भरलं नाही. नंतर त्याने मेव्हण्याची मदत घेतली आणि मोना ज्या अरविंद सोबत पळून गेली असं सांगितल होतं, त्याच्या नावाने (रविनचं) मोनाच्या कुटुंबियांशी बोलणं करून दिलं. आरोपीकडे मोनाचे अनेक रेकॉर्ड केलेले ऑडिओ होते, जे एडिट करून तो (राणा) तिच्या कुटुंबीयांना पाठवायचा जेणेकरून ती जिवंत आहे यावर त्यांचा विश्वास बसेल. पोलिस आणि पीडितेच्या कुटुंबाला फसवण्यासाठी आरोपी हा देहविक्रय करणाऱ्या महिलांसोबत, हरियाणातील डेहराडून, ऋषिकेश आणि मसूरी येथील हॉटेल्समध्ये जात असे.

मोनाच्या नावे हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेला घेऊन जायचा आरोपी

आरोपी त्या महिलांसोबत वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जायचा आणि मोनाची कागदपत्रे मुद्दाम तिथेच सोडून यायचा. त्यानंतर तो फोन करून पोलिसांना माहिती देत ​​असे. यानंतर पोलीस हॉटेलमध्ये पोहोचल्यावर मोना हॉटेलमध्ये आल्याची खात्री इतर कर्मचारी देत असत. अखेर बऱ्याच तपासानंतर आणि अनेक लीड्सनंतर कटाचा पर्दाफाश झाला आणि राणानेच तिचा खून केल्याचे समोर आले, असे पोलिसांनी सांगितले.