फॅक्टरीत लाकडी पेटीत सापडले बेपत्ता मुलांचे मृतदेह, माजली एकच खळबळ ; कुठे घडली ही घटना ?

| Updated on: Jun 07, 2023 | 11:20 AM

जामिया नगर येथील एका कारखान्यात 7 आणि 8 वर्षांच्या दोन मुलांचे मृतदेह लाकडी पेटीत सापडले आहेत. दोघेही कालपासून बेपत्ता होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

फॅक्टरीत लाकडी पेटीत सापडले बेपत्ता मुलांचे मृतदेह, माजली एकच खळबळ ;  कुठे घडली ही घटना ?
Follow us on

Crime News : एका खळबळजनक प्रकारामुळे राजधानी पुन्हा हादरली आहे. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका कारखान्यातून दोन मुलांचे मृतदेह (bodies of 2 children) सापडले आहेत. दोघांचेही मृतदेह लाकडी पेटीत (wooden box) ठेवण्यात आले होते. कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांनी मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलीस या घटनेसंदर्भात पुढील तपास करत आहेत. दिल्लीतील जामिया नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दक्षिण पूर्व दिल्लीच्या डीसीपींनी सांगितले की, मृत मुलांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे. दोन्ही मुलांचे वय सात आणि आठ वर्षे आहे. दोघेही 5 जूनपासून बेपत्ता होते. प्राथमिक तपासात मुलांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, असे डीसीपी म्हणाले.

 

लाकडी पेटीत सापडले दोघांचे मृतदेह

डीसीपींनी सांगितले की, हा तपासाचा विषय असला तरी दोन्ही मुलांचे मृतदेह लाकडी पेटीत ठेवण्यात आले होते. दोन्ही मुलं याठिकाणी लपून बसली असावीत आणि त्यांना कोणी पाहिलं नसावं, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या आम्ही पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत, असे ते म्हणाले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल. घटनास्थळी तपासासाठी एफएसएल आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळावरून नमुने घेतले आहेत.

गुदमरल्याने मृत्यू झाल्याची शक्यता

दोन्ही मृत मुलं ही त्यांच्या आई-वडिलांसोबत राहत होती. बलबीर असे मुलांच्या वडिलांचे नाव आहे. बलवीर हा या कारखान्यात चौकीदार म्हणून काम करतो. मृत मुलांनी त्यांच्या पालकांसोबत सोमवारी दुपारी जेवण केले आणि दुपारी ३.३० च्या सुमारास ते बेपत्ता झाले, असे स्थानिक लोकांकडे केलेल्या चौकशीतून उघड झाले आहे. बराच वेळ मुलं न सापडल्याने आई-वडील व इतर मुलांनी त्यांचा शोध सुरू केला, मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. अखेर कारखान्यातील लाकडी पेटीत त्यांचे मृतदेह आढळले. मात्र, शरीरावर कोणतीही जखम नसून, अपघाताने गुदमरल्याचा प्रकार असल्याचा कयास लावला जात असून पोलिस पथकाने त्याला दुजोरा दिला आहे.