दिल्ली : दिल्लीच्या (Delhi) प्रेमनगर (Premnagar) परिसरात एक घटना नुकतीच घडली आहे. एखाद्याला दारुचं व्यसन लागल्यानंतर त्याचे काय परिणाम घराच्यांना भोगावे लागतात, हे दिल्लीत (Delhi crime news) झालेल्या घटनेवरुन दिसून आलं आहे. पहिल्यांदा वडिलांना मारहाण केली. त्यानंतर नातवाने आईला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. नातवाने इतक्या भयानक पद्धतीने मारहाण केली की, आजीचा जागीचं मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे.
या प्रकरणी पोलिसांच्याकडे एक तक्रार दाखल झाली आहे. अफरोज(62) यांनी तक्रार दिली आहे. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत इंदर एंक्लेव किराड़ी परिसरात राहतात. त्याचबरोबर त्यांची 90 वर्षाची आई आणि तीन मुलं शाहरुख (३०), इम्रान (२८), रशीद (२२) असा परिवार आहे.
11 फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजता अफरोज आणि त्यांची आई घरी होती. त्यावेळी त्यांचा शाहरुख नावाचा मुलगा दारु पिऊन घरी आला. त्यावेळी त्याला मुलगा शाहरुखने दारु पिली होती. त्यानंतर त्याने घरात असलेल्या लोकांना मारहाण करायला सुरुवात केली. सुरुवातीला वडिलांना बेदम मारहाण केली. त्यानंतर मध्यस्थी करायला आलेल्या आजीला मारहाण करु लागला. आईला इतकी बेदम मारहाण केली की, तिचा जागीचं मृत्यू झाला.
ज्यावेळी दारु पिलेला शाहरुख घरी आला, त्यावेळी कुटुंबियांचं आणि त्याचं क्षुल्लक कारणावरुन भांडण झालं. त्यावेळी मुलगा आपल्या वडिलांना मारहाण करु लागला. त्यावेळी वाचवण्यासाठी आलेल्या आजीला नातावाने मारहाण करण्यास सुरुवात केली. नातवाने इतकी बेदम मारहाण केली की, आजी बेशुध्द झाली.
दुसऱ्या दिवशी ज्यावेळी घरचे सगळे उठले, त्यावेळी आजीला उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी आजीचं निधन झाल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं. त्यानंतर वडील अफरोज यांना मुलगा शाहरुख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आजीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे. आजीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून कुटुंबियाच्या चौकशी सुरु आहे.