दिल्लीत रस्त्यावर दबंगगिरी, बोनेटवर पडला इसम, कारचालकाने 3 किमी फरपटत नेले, थोडक्यात वाचला जीव

| Updated on: May 01, 2023 | 1:26 PM

Delhi Road Rage Incident : दिल्लीतील आश्रम चौक ते निजामुद्दीन दर्गादरम्यान एक थरारक प्रकार घडला आहे. कारच्या बोनेटवर एक व्यक्ती लटकलेली असतानाही कारचालकाने गाडी न थांबवता तशीच 3 किमी पुढे नेल्याची घटना घडली आहे.

दिल्लीत रस्त्यावर दबंगगिरी, बोनेटवर पडला इसम, कारचालकाने 3 किमी फरपटत नेले, थोडक्यात वाचला जीव
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा रोड रेजचे (Road Rage) प्रकरण समोर आले आहे. दिल्लीच्या दक्षिण-पूर्व भागातील आश्रम चौक ते निजामुद्दीन दर्गा दरम्यान कारच्या बोनेटवर एक व्यक्ती लटकलेली (man on car bonnet) असतानाही कारचालकाने गाडी न थांबवता तशीच पुढे नेल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेच्या व्हिडिओमध्ये (video) कारचा चालक बोनेटला लटकलेल्या व्यक्तीला घेऊन जाताना दिसत आहे. कारच्या चालकाने या व्यक्तीला सुमारे 3 किलोमीटरपर्यंत तसेच लटकत नेल्याचे समजते.

अखेर दिल्ली पोलिसांच्या पीसीआर व्हॅनने ओव्हरटेक केल्यावर ही कार थांबली. रविवारी रात्री अकराच्या सुमारास कार चालक आश्रम चौक येथून निजामुद्दीन दर्ग्याकडे जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला.

काय आहे प्रकरण  ?  

मिळालेल्या माहितीनुसार, बोनेटवर जी व्यक्ती लटकलेली होती त्याचे नाव चेतन ते एक कॅब ड्रायव्हर आहेत. तर अशी बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या आरोपी ड्रायव्हरचे नाव रामचंद कुमार असे आहे. यासंदर्भात चेतन यांनी सांगितले की, एका प्रवाशाला सोडल्यानंतर परत येत असताना आरोपीच्या कारने त्याच्या वाहनाला तीन वेळा स्पर्श केला. यामुळे चेतन यांना राग आला व ते जाब विचारण्यासाठी रामचंद कुमार याच्या गाडीसमोर गेले. मात्र रामचंद याने गाडी तशीच सुरू केल्याने चेतनला हे त्याच्या गाडीचे बोनेटवर पडले व तेथेच लटकले. असे असतानाही रामचंदने गाडी न थांबवता ती चालवायला सुरूवात केली.

 

कॅब चालक चेतनने पोलिसांना सांगितले की, ‘मी ड्रायव्हर म्हणून काम करतो, एका प्रवाशाला खाली उतरवून परत येत होतो. मी आश्रमाजवळ पोहोचलो तेव्हा एका गाडीने माझ्या गाडीला तीनदा स्पर्श केला आणि मग मी माझ्या गाडीतून उतरून त्यांच्या गाडीसमोर उभा राहिलो. त्यानंतर तो कार चालवू लागला. मी बॉनेटवर लटकलो आणि तो मला बोनेटला लटकवून आश्रम चौक ते निजामुद्दीनपर्यंत नेत राहिला. मी त्याला थांबायला सांगितलं, पण तो थांबला नाही. ती व्यक्ती पूर्णपणे नशेत होती. वाटेत मला एक पीसीआर पार्क केलेला दिसला, आरोपीने गाडी थांबवेपर्यंत ते आमच्या मागे लागले.’

याप्रकरणी आरोपी रामचंद कुमार म्हणाले की, सर्व आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. त्यांच्या कारचा, कॅब चालक चेतनच्या वाहनाला स्पर्श झाला नाही. कॅब ड्रायव्हरने जाणूनबुजून त्याच्या कारच्या बोनेटवर उडी मारली व तो लटकू लागला. मी त्याच्या गाडीला हात लावला नाही. त्याने गाडीवर उडी मारल्यानंतर मी त्याला खाली उतरण्यास सांगितले तेव्हा त्याने ऐकले नाही. मी पुन्हा माझी गाडी थांबवली आणि त्याला विचारले काय करतोय?