नाशिक : नाशिक शहरातील (Nashik City) अंबड परिसरातील नागरिक गुन्हेगारीने अक्षरशः हैराण झाले आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून अंबड औद्योगीत वसाहतीमध्ये स्वतंत्र पोलीस ठाणे (Police Station) निर्माण करून द्या अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे. मात्र, वर्षानुवर्षे मागणी मान्य होत नसतांना गुन्हेगारांचा हैदोस काही केल्या कमी होत नाहीये. अशातच आता स्थानिक लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी थेट मुंबईला (Mumbai) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी पायी मोर्चा काढला जाणार आहे. अंबड परिसरात कधी धारधार शस्र घेऊन मध्यरात्री धिंगाणा घातला जातो, तर नागरिकांच्या घरावर दगडफेक करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर कधी थेट वाहने जाळपोळ केल्याच्या घटना घडत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.
नाशिकच्या अंबड परिसरातील माजी नगरसेवक राकेश दोंदे आणि परिसरातील नागरिकांनी काही दिवसांपासून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
पोलीस आयुक्त यांच्यासह आमदारांकडे अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करून द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहे.
त्यातच मागणीला यश येत नसल्याने नागरिक आधीच संतप्त असतांना नागरिकांच्या घरावर दगडफेक, वाहनांची जाळपोळ, अपहरण, खून आणि घरफोडी सारख्या घटना घडत आहे.
अंबड परिसर हा मोठा असल्याने पोलिसांचे मनुष्यबळ देखील कमी पडत असून गुन्हेगारी रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.
अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप येथी लोकप्रतिनिधी आणि नागरिक करीत असून थेट मुख्यमंत्र्यांकडे कथन करणार आहे.
नाशिक येथून शनिवारी हा मोर्चा सकाळी 9 वाजता निघणार आहे. कारगिल चौक येथून सुरुवात होणार आहे.
पुढे लागणाऱ्या पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाणार असून नागरिक मुंबईकडे रवाना होणार आहे.
साहेबराव दातीर, रामदास दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे संदीप नाठे, हेमंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई पदमोर्चा काढण्यात येणार आहे.