ठेकेदाराकडून बिल काढण्यासाठी लाच मागितली, अभियंत्याला रंगेहाथ अटक

| Updated on: Oct 18, 2022 | 11:00 PM

तडजोडीअंती त्यांच्याकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही रक्कम स्वीकारताना नवी मुंबई अँटी करप्शन विभागानं संजय माने यांना अंबरनाथ एमआयडीसी कार्यालयात रंगेहाथ अटक केली.

ठेकेदाराकडून बिल काढण्यासाठी लाच मागितली, अभियंत्याला रंगेहाथ अटक
अंबरनाथमध्ये अभियंत्याला लाट स्वीकारताना रंगेहाथ पकडले
Image Credit source: TV9
Follow us on

अंबरनाथ : बिल मंजूर करण्यासाठी एमआयडीसीच्या ठेकेदाराकडून लाच घेताना अंबरनाथमध्ये एमआयडीसीच्या उप कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ अटक (Deputy Executive Engineer of MIDC arrested) करण्यात आली आहे. संजय माने असं या अभियंत्याचं नाव असून ते बारवी धरण (Baravi Dam) विभागात कार्यरत होते. नवी मुंबई अँटी करप्शन विभागाने (Anti corruption department) ही कारवाई केली.

बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच

तक्रारदार हे एमआयडीसीचे ठेकेदार असून त्यांनी बारवी धरणाच्या विश्रामगृहाची देखभाल दुरुस्ती आणि साफसफाईचं काम घेतलं आहे. त्यांच्या कामाचं 2 लाख 20 हजार रुपयांचं बिल कोणतीही त्रुटी न काढता मंजूर करण्यासाठी आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ठेवलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी उपकार्यकारी अभियंता संजय माने यांनी त्याच्याकडे 78 हजार रुपयांची लाच मागितली.

तडजोडीअंती त्यांच्याकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही रक्कम स्वीकारताना नवी मुंबई अँटी करप्शन विभागानं संजय माने यांना अंबरनाथ एमआयडीसी कार्यालयात रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे एमआयडीसीच्या अंबरनाथ कार्यालयात फोफावलेला भ्रष्टाचार आणखी मोठ्या प्रमाणात बाहेर येण्याची चिन्हं आहेत.

हे सुद्धा वाचा

पालघरमध्ये उपअभियंत्याला एक लाखाची लाच

पालघरमध्ये महावितरण विभागाच्या लाचखोर उपभियंत्याला एक लाख रुपयांची लाच घेताना पालघर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. वाडा महावितरण विभागाचे उपभियंता ज्ञानेश्वर वट्टमवर असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे.

महावितरण विभागाचं काम केलेल्या एका ठेकेदाराला बिल देण्यासाठी या अधिकाऱ्याने तब्बल एक लाख रुपयांची लाच मागितली. ठेकेदाराकडून लाच घेताना या अभियंत्याला अटक केली असून वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.