Crime : महिला रात्रीची बाथरूममध्ये गेली, दीरही गेला मागोमाग अन्… जे घडलं त्याने संपूर्ण गाव गेलंय हादरून!

| Updated on: Apr 11, 2023 | 6:52 PM

आता नियम, कायदे आणि पोलीस सर्व काही आहे मात्र तरीसुद्धा असे काही समाजकंटक आहेत ज्यांना याची काहीच भीती नाही. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime : महिला रात्रीची बाथरूममध्ये गेली, दीरही गेला मागोमाग अन्... जे घडलं त्याने संपूर्ण गाव गेलंय हादरून!
Follow us on

Crime News :  आता नियम, कायदे आणि पोलीस सर्व काही आहे मात्र तरीसुद्धा असे काही समाजकंटक आहेत ज्यांना याची काहीच भीती नाही. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली असून घरामधीलच नराधम लांडग्याने लांडग्याने संधी साधत वहिनीवर रेप केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. नराधमची मानसिकता इतकी वाईट होती की त्याने बाथरूममध्ये जात तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. इतकंच नाहीतर त्यापुढेही पीडितेसोबत वाईट कृत्य केलंय.

नेमकं काय घडलं?

महिला पोलीस अधिकारी इंद्रलाल महर्षी यांनी सांगितल्यानुसार, सरदारशहर गावामधील तरूणासोबत पीडितेच लग्न झालं होतं. एक दिवस रात्रीची ती बाथरूममध्ये गेली. त्याचवेळी तिच्या पतीच्या मामेभावाने तिला जाताना पाहिला. याचा त्याने फायदा घेतला, तिच्या मागोमाग आला आणि तोसुद्धा आतमध्ये गेला.

आतमध्ये जाताच ती घाबरली आणि आरडाओरडा सुरू केला मात्र आरोपीने त्याच्या जवळील चाकू बाहेर काढला. चाकू बाहेर काढत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिथेच तिच्यावर जबरदस्ती आणि धमकी देत शरीरसंबंध ठेवले आणि बाथरूमची कडी लावत त्याने तिथून पळ काढला. घडलेला सर्व प्रकार तिने आपल्या सासू सासऱ्यांना सांगितला त्यावेळी तिथे आरोपी विक्रमही आला. मात्र तिघांनी तिलाच मारहाण केली.

हा सर्व प्रकार पीडितेच्या आईला कळताच ती आपल्या मुलीला घण्यासाठी तिथे गेली. मात्र तेव्हा दोघींनाही मारहाण करण्यात आली मात्र कसाबसा दोघींनी तिथून पळ काढला आणि रतननगर पोलीस ठाणे गाठलं. मात्र पोलिसांनी रात्री दोन पांढर्‍या कागदांवर पीडितेची सही आणि अंगठा घेतला आणि सकाळी गुन्हा दाखल करू असं सांगितल. त्यानंतर पीडितेने पुन्हा पोलीस ठाण्यात जात दीर विक्रमवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी पीडितेची शासकीय भरतिया जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत. ही  घटना राजस्थानमधील चूरू जिल्ह्यातील रतननगर पोलीस स्टेशनच्या परिसरातील आहे.