मनोहर शेवाळे, मालेगाव : हाणामारी करणाऱ्या आरोपीला मालेगावच्या (malegaon) न्यायालयाने (court) 21 दिवस नमाज अदा करणे आणि मशिदीच्या आवारात दोन झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. मालेगावच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच अशी आगळीवेगळी शिक्षा सुनावण्यात आल्यानं निकालाची सर्वत्र चर्चा आहे. मालेगाव सोनापुरा मशिदीत नमाज (Mosque) अदा करणारा आणि मशिदीच्या आवारात झाडांना पाणी घालणारा रउफ खान असे नाव आहे. रिक्षाचालक असणाऱ्या रुउफचे पाच वर्षांपूर्वी फिर्यादीशी भांडण झाले. त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. रुउफ ने फिर्यादीच्या गालात मारल्याने त्याच्या विरोधात मारहाण करणे, धमकवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .
त्याला दंड आकारण्यात आल्यानंतर त्याची परिस्थिती नाही असे त्याने कोर्टात सांगितले. रुउफ कडून गुन्हा घडला, त्याचा पश्चात्ताप त्याला झाला आहे. त्याची लहान मुले, घरची हलाखीची परिस्थिती आणि त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप बघून न्यायालयाने सहानुभूती पूर्वक विचार करत त्याला सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. न्यायाच्या मंदिरात झालेल्या या आगळ्यावेगळ्या न्याय दानाची सर्वत्र प्रशंसा होत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून न्याय पालिकावर शंका उपस्थित करण्याचा प्रघात सुरू आहे, अशा सर्वाना हा निकाल आश्चर्यचा सुखद धक्का देणारा निकाल आहे.
पाचवर्षापुर्वी झालेल्या भांडणाची चर्चा झालेल्या शिक्षेमुळे सगळीकडे सुरु आहे. काही किरकोळ कारणावरुन एकाला मारहाण केली. त्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये गेली. त्यानंतर दोन्ही पार्टीकडून केस पुढे गेली. मागच्या पाच वर्षात दोन्ही बाजू कोर्टात मांडण्यात आल्या, अखेरीस मालेगाव कोर्टाने रिक्षा चालकाला शिक्षा सुनावली. 21 दिवस नमाज अदा करणे आणि मशिदीच्या आवारात दोन झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यामुळे मालेगावात सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.