VIDEO | लोकलमध्ये या महिला अशा भांडल्या की, तुम्ही म्हणाल जामीन मिळणे कठीण?

| Updated on: Oct 06, 2022 | 7:31 PM

अखेर इतर प्रवाशांकडून रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानुसार नेरूळ स्थानकातून महिला पोलीस कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी या लोकलमध्ये चढली.

VIDEO | लोकलमध्ये या महिला अशा भांडल्या की, तुम्ही म्हणाल जामीन मिळणे कठीण?
सीटवरुन महिलांमध्ये वाद
Image Credit source: Google
Follow us on

रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई : लोकलमध्ये सीटवरुन झालेला वाद (Dispute over seat) इतका टोकाला गेला की, महिलांनी एकमेकींचे डोकेच फोडल्याची घटना पनवेल लोकलमध्ये घडली आहे. ठाण्याहून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये (Panvel Local) प्रवासी महिलांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी (Fighting between two ladies group) झाल्याची घटना काल संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. सुरवातीला तीन महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मग या बाचाबाचीचे हाणामारीत रुपांतर झाले. हाणामारीचा हा व्हिडिओ तुम्हाला विचलीत करु शकतो.

ठाणे-पनवेल लोकलमधील घटना

ठाणे स्थानकावरुन काल संध्याकाळच्या सुमारास ठाणे-पनवेल लोकल सुटली. या लोकलमध्ये ठाण्यावरून मायलेकी आणि नात या तिघी चढल्या होत्या. तर कोपरखैरणे येथे मारहाण केलेली महिला चढली. तुर्भे स्थानकात त्या महिलेला बसायला आसन मिळाले.

लोकलमधील सीटवरुन भांडण

ती महिला सीटवर बसल्याने मायलेकी संतापल्या. छोट्या मुलीला बसू दिलं नाही यावरून प्रवासी महिलांचा सदर महिलेसोबत जोरदार शाब्दिक वाद सुरु झाला. हळूहळू या शाब्दीक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

अखेर इतर प्रवाशांकडून रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानुसार नेरूळ स्थानकातून महिला पोलीस कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी या लोकलमध्ये चढली.

महिला पोलिसालाही मारहाण

महिला पोलिसाने दोन्ही गटातील महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त प्रवासी महिलांनी त्यांना देखील जुमानले नाही. मात्र वाद शांत होण्याऐवजी अधिक चिघळला. सदर महिलांनी महिला पोलिसाला देखील मारहाण केली.

मारामारी इतकी भयानक होती की यात एका महिलेसह महिला पोलीस कर्मचारीही जखमी झाली आहे. याप्रकरणी वाशी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.