रुग्णाला मृत घोषित केले म्हणून डॉक्टरला मारहाण, डॉक्टरला किरकोळ जखमी

| Updated on: Mar 28, 2023 | 11:20 AM

एका व्यक्तीला छातीत दुखू लागल्याने मिरज सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांनी तात्काळ रुग्णाला अतिदक्षता विभागात घेत तपासले. मात्र रुग्णालयात येण्याआधी रुग्णाचा मृत्यू झाला होता.

रुग्णाला मृत घोषित केले म्हणून डॉक्टरला मारहाण, डॉक्टरला किरकोळ जखमी
मिरज सिव्हिल रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरला मारहाण
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली / शंकर देवकुळे : मिरज सिव्हिल रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णाला मृत घोषित केले म्हणून डॉक्टरवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. मारहाणीची घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संदीप गोटे असे हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुन्हा एकदा डॉक्टरवर हल्ला केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिरज शासकीय रुग्णालयात घडली घटना

छातीत दुखू लागल्याने विनोद ज्ञानोबा गोटे यांना रविवारी मिरज शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात आणले होते. त्यांना तात्काळ अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. भावाला मृत घोषित केल्याने संदीप गोटे हा संतापला. डॉक्टरांच्या अंगावर धावून जात ‘तू पेशंटला पाहिले आहेस का’ असे विचारत त्यांचा गळा दाबून मागे ढकलले.

डॉक्टरच्या हाताला दुखापत

या घटनेत डॉ. विजय कदम यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. याप्रकरणी अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरला मारहाण केल्याबद्दल संदीप गोटे याच्याविरुद्ध गांधी चौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

मद्यपी आरोग्यसेवकाकडून रुग्णाला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न

तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी पुरुष आरोग्य सेवकाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची धक्कादायक बाब समोर आली. एका 13 वर्षाच्या मुलीची तब्येत बिघडल्याने पालक तिला तलासरी तालुक्यातील उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले.

यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मद्यपी पुरुष आरोग्य सेवकाकडून चक्क डॉक्टरचा सल्ला न घेताच मुलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रुग्णाच्या सोबत असलेल्या कुटुंबीयांनी त्याला रोखून धारेवर धरलं.