मिठाईचा खोका उघडला आणि बोलतीच बंद झाली.. असं काय होत त्यामध्ये ? डॉक्टरांचं कुटुंब चिंतेत

| Updated on: Nov 13, 2023 | 9:27 AM

एका डॉक्टरला दोघांनी मिठाईचा बॉक्स दिला. त्यांनी तो घेतलाही. पण घरी येऊन तो बॉक्स उघडल्यावर ते हादरलेच, असं काय होतं त्या बॉक्समध्ये ?

मिठाईचा खोका उघडला आणि बोलतीच बंद झाली.. असं काय होत त्यामध्ये ? डॉक्टरांचं कुटुंब चिंतेत
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us on

फरीदकोट | 13 नोव्हेंबर 2023 : दिवाळीनिमित्त एकमेकांच्या घरी जाऊन फराळाचा आस्वाद घेतला जातो. मिठाईची सुद्धा देवाणघेवाण होते. पण असाच एक मिठाईचा बॉक्स घेणं डॉक्टरला महागात पडलं. पंजाबच्या फरीदकोटमधील ही घटना आहे. तिथे एका डॉक्टरला दोघांनी मिठाईचा बॉक्स दिला. त्यांनी तो घेतलाही. पण घरी येऊन तो बॉक्स उघडल्यावर ते हादरलेच, असं काय होतं त्या बॉक्समध्ये ?

खरंतर त्या मिठाईच्या बॉक्समध्ये मिठाई नव्हे तर एक पत्र होतं. आणि त्या पत्राद्वारे डॉक्टरकडे खंडणी मागण्यात आली. आणि खंडणीची ही रक्कम दिली नाही तर जीव धोक्यात येईल, अशी धमकीही डॉक्टरला देण्यात आली. ही संपूर्ण घटना तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे.

खरंतर शुक्रवारी मास्क घातलेल्या दोन गुन्हेगारांनी फरीदकोट येथील रहिवासी प्रसिद्ध डॉक्टर भावेश गोयल यांच्याकडे दीड लाख रुपयांची खंडणी मागितली. यानंतर भावेश गोयल यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. डॉक्टराच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी मास्क घातलेल्या दोन्ही हल्लेखोरांची ओळख पटवली आहे.

काय म्हणाले एसएचओ ?

एसएचओच्या सांगण्यानुसार, एक दिवसापूर्वी मास्क घातलेले दोन जण बाईकवरून, फरिदकोटचे प्रसिद्ध डॉक्टर भावेश गोयल यांच्याकडे आले होते. त्यांनी त्यांना एक बॉक्स दिला. त्या मिठाईच्या बॉक्समध्ये एक पत्र होतं, ज्यात दीड लाख रुपयांची खंडणी मागितली होती. सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही दोन्ही हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. मात्र खंडणीचे हे पत्र वाचून डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय चांगलेच हादरले आहेत.

हल्लेखोर आणि पोलिसांमध्ये चकमक

तर दुसरीकडे अमृतसरमध्ये एका लग्न समारंभात दोन पक्षांमध्ये गोळीबार सुरू झाला. वास्तविक, ही चकमक पोलिस आणि हल्लेखोरांमध्ये होती. तरन तारण रोडवरील वरपाल गावात असलेल्या हायफाय रिसॉर्टमध्ये 3 वाँटेड गुन्हेगार लग्नासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्यांना वाटेत पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ते पळून जाऊ लागले.

अमृतसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदमाशांनी एसएचओवर गोळीबार केला. यानंतर पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये क्रॉस फायरिंग सुरू झाली. वधू-वर दोघांचेही कुटुंबीय हे या गुन्हेगारांना ओळखत नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. या तिन्ही बदमाशांना अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितलं.