लातूर – लातूर (latur) जिल्ह्यातल्या किनगाव (Kingaon) इथं यात्रेत पिसाळलेल्या कुत्र्याने (dog) 8 जणांना चावा घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये महिलांसह मुलींचा समावेश आहे. अहमदपूर तालुक्यातल्या किनगाव इथं हजरत पिर गैबी बाबां दरगाहचा उरूस भरतो. या उरुसाच्या निमित्ताने मोठी गर्दी होत असते. या गर्दीत पिसाळलेला कुत्रा घुसला आणि त्याने 8 जणांना चावा घेतला. चावा घेतलेल्या लोकांना किनगाव इथल्या प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. आणखी कुणाला कुत्र्याने चावा घेतला आहे का ? या शोध आरोग्य विभाग घेत आहे.
उरुस असल्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी होती. त्यामध्ये अचानक पिसाळलेलं कुत्र घुसलं, कुत्र घुसल्याची लोकांना माहिती नव्हती. परंतु कुत्र्याने चावा घ्यायला सुरुवात केल्यानंतर लोकांची तारांबळ उडाली. लोक इकडं तिकडं धावू लागली. त्यावेळी कुत्र्याने महिला आणि मुलांना फोडून काढले.
पिसाळलेलं कुत्र उरुसात घुसल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. त्यानंतर कुत्र्याने ज्या लोकांना चावा घेतला आहे, त्यांना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.