डोंबिवली पूर्व येथील खंबाळपाडा परिसरात 2ऑगस्टला रिक्षा नंबर लावण्यावरून झालेल्या वादात भर रस्त्यावर एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला हत्या केली होती या गोष्टीला पंधरा दिवस ही उलटले नाहीत याआधी डोंबिवलीत पुन्हा पार्किंगच्या वादातून भर रस्त्यात पाच ते दहा जणांच्या एका गोदाम मालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीनंतर उपचारादरम्यान गोदाम मालकाचा मृत्यू झाला. बबलू गुप्ता असे मयत गोदाम मालकाचे नाव असून या प्रकरणानंतर डोंबिवली परिसरात गुन्हेगारी वाढत असताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सध्या या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
दोन ऑगस्ट रोजी खंबाळपाडा परिसरात अश्विन कांबळे या रिक्षा चालकाची रिक्षा नंबर लावण्यावरून झालेल्या वादात भर रस्त्यावर दुसऱ्या रिक्षाचालकाने लोखंडी रॉडने हल्ला करत हत्या केली होती. या गोष्टीला पंधरा दिवस ही उलटले नाहीत याआधी 13 ऑगस्टच्या सायंकाळी गोळवली परिसरातील पेपरचे गोदामाचे मालक बबलू बद्रीनाथ गुप्ता यांचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला. नेमका वाद काय झाला होता जाणून घ्या.
चारचाकी गाडी रस्त्यावर लावली त्या ठिकाणी तीन-चार दुचाकी उभ्या होत्या. त्यावर काही तरुण बसले होते. त्या पैकी एका दुचाकी वाल्याने फोन वाजवत बबलूला गाडी बाजूला सांगितले मात्र मात्र यावरून त्यांचा वाद झाला. वादाचं रूपांतरित हाणामारीत झालं, त्या दुचाकीस्वाराने आपले काही साथीदार त्या ठिकाणी बोलवून घेतले. मग पाच ते दहा जणांच्या टोळीने मिळून बबलूला आणि त्याच्या दुकानात कामाला असलेल्या कामगाराला बेदम मारहाण सुरु केली.
तब्बल वीस मिनिटांच्या मारहाणीनंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी त्यांचा हा वाद सोडवला. गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या बबलूला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यातआले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र पंधरा दिवसात भर रस्त्यात दुसरी हत्या झाल्याने डोंबिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.