Dombivli : 2 मिनिटं तुझा आवाज ऐकायचाय; फक्त एकदा माझ्याशी बोल ना.. पत्नीला शेवटचा कॉल केला आणि अघटित घडलं ! त्याने थेट…

| Updated on: Dec 23, 2023 | 8:54 AM

पत्नीला फोन करून एकदा, शेवटचा तुझा आवाज ऐकायचा आहे, अशी इच्छा पतीने व्यक्त केली. मात्र कॉल झाल्यानंतर पत्नीच्या व्हॉट्सॲपवर जो मेसेज आला, तो पाहून तिचं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त झालं. समोरचा फोटो पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली

Dombivli : 2 मिनिटं तुझा आवाज ऐकायचाय; फक्त एकदा माझ्याशी बोल ना.. पत्नीला शेवटचा कॉल केला आणि अघटित घडलं ! त्याने थेट...
Follow us on

डोंबिवली | 23 डिसेंबर 2023 : आयुष्य एकदाच मिळतं, मात्र काही वेळा भावनेच्या भरात असं एखादं कृत्य केलं जातं, ज्यामुळे हे अनमोल आयुष्य मातीमोल होतं. अशीच एक दुर्दैवी घटना डोंबिवलीमध्ये घडली. पत्नीला फोन करून एकदा, शेवटचा तुझा आवाज ऐकायचा आहे, अशी इच्छा पतीने व्यक्त केली. मात्र कॉल झाल्यानंतर पत्नीच्या व्हॉट्सॲपवर जो मेसेज आला, तो पाहून तिचं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त झालं. समोरचा फोटो पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिच्या पतीने स्वत:चं आयुष्य संपवत असल्याचं सांगत गळफास लावल्याचा फोटोच पत्नीला पाठवला. त्याने भावनेच्या भरात एका क्षणात हा टोकाचा निर्णय घेत स्वत:चं जीवनच संपवलं.

डोंबिवलीमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सुधाकर यादव (वय 41) असे मृत इसमाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

भांडणानंतर पत्नी बहिणीकडे राहायला गेली आणि…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर यादव आणि त्यांची पत्नी संजना यादव (वय 31) या दोघांमध्ये 19 डिसेंबरला जोरदार भांडण झालं. त्यामुळे संतापलेली संजना दिवा येथे राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे निघून गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 च्या सुमारास सुधाकर यांनी संजनाला फोन केला. तेव्हा ती कुर्ला येथील ऑफीसच्या दिशेने जात होती. ‘ मला 2 मिनिटं तुझा आवाज ऐकायचाय’ असं सुधाकरने संजनाला सांगितलं. ते थोडा वेळ बोललेही. मात्र कॉल ठेवल्यानंतर काही क्षणांतच संजना हिला व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला, ज्याने ती हादरलीच. कारण तो फोटो सुधाकरने तिला पाठवला होता, आणि त्या फोटोमध्ये तो गळफास घेताना दिसत होता.

शेजाऱ्यांनी धाव घेतली पण खूप उशीर..

हे पाहताच संजनाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने सुधाकरला फोन लावायचा प्रयत्न केला , पण त्याने काही कॉल उचलला नाही. अखेर तिने शेजाऱच्यांना फोन करून सर्व गोष्टीची कल्पना दिली आणि घरी जाऊन पती सुधाकरकडे लक्ष देण्यास सांगितले. ते ऐकून शेजारच्यांनी तातडीने सुधाकरच्या घरी धाव घेतली, दार , बेल सगळं वाजवलं पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही.
त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी बराच प्रयत्न करून त्यांच्या घराचा दरवाजा तोडला, तेव्हा समोरचं दृश्य पाहू ते हादरले. तोपर्यंत खूपच उशीर झाला होता, सुधाकरने गळफास घेऊन स्वत:चं आयुष्यच संपवलं. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.