एसीबी पथकाचा डबल धमाका, एकाचं परिसरात दोन ठिकाणी कारवाई, प्रकरण माहित झाल्यानंतर

| Updated on: May 12, 2023 | 9:18 AM

बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी एसीबीची कारवाई, दोघांना लाच घेताना रंगेहात घेताना पकडले, अँटी करप्शन ब्युरोचा डबल धमाका अशी बुलढाणा जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.

एसीबी पथकाचा डबल धमाका, एकाचं परिसरात दोन ठिकाणी कारवाई, प्रकरण माहित झाल्यानंतर
buldhana news
Image Credit source: tv9marathi
Follow us on

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) परिसरात काल एक अशी घटना घडली, त्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे. दोघांना लाच घेताना एसीबी पथकाने (ACB Team) रंगेहात पकडले. हा प्रकार एकाचं दिवशी दोन ठिकाणी घडल्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामावर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. अभिलेख चे उपअधिक्षक जितेंद्र देहरे, हेड कॉन्स्टेबल राजेश मानकर या दोघांना लाज घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. दोघांची चौकशी करणात येणार आहे. याच्या आगोदर सुध्दा यांनी अशा पद्धतीचे काही कृत्य केली आहेत का ? हे सुध्दा तपासून पाहिलं जाणार आहे. कारवाई झाल्यापासून हे प्रकरण संपूर्ण जिल्ह्यात (buldhana crime news) चर्चिलं जात आहे.

पहिल्या प्रकरणात काय झालं ?

बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी एसीबीची कारवाई, दोघांना लाच घेताना रंगेहात घेताना पकडले, अँटी करप्शन ब्युरोचा डबल धमाका अशी बुलढाणा जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथे पोलीस कर्मचारी तर सिंदखेडराजा येथील भूमी अभिलेख कर्यक्याचे उपअधीक्षक याना सुद्धा लाच घेताना रंगेहात पकडले.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या प्रकरणात काय झालंय ?

तक्रारीतून नाव वगळण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना हेड कॉन्स्टेबल राजेश मानकर याला एसीबीच्या पथकाने काल सायंकाळी रंगेहाथ पकडले. ही कारवाई चांडोळमध्ये पोलीस चौकीतच झाली. तर याच वेळेला सिंदखेडराजामध्ये सुद्धा एसीबीचे दुसरे पथक कार्यरत होते. सिंदखेडराजा येथील भूमी अभिलेख चे उपअधिक्षक जितेंद्र देहरे यांना सुद्धा 5 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अँटी करप्शन ब्युरोच्या या डबल धमाक्याने लाचखोरांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.