दसऱ्यानिमित्त सुरू होती पूजा, चोरट्याने डाव साधत स्कूलबसच पळवली

| Updated on: Oct 15, 2024 | 9:08 AM

राज्यभरासह मुंबईतही गुन्ह्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. गेल्या काही दिवसांतील घडलेल्या घटना पाहता राज्यात कायदा सुव्यवस्था काही उरली आहे की नाही असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे

दसऱ्यानिमित्त सुरू होती पूजा, चोरट्याने डाव साधत स्कूलबसच पळवली
पूजा सुरू असतानाच चोरट्याने स्कूलबस पळवली
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us on

राज्यभरासह मुंबईतही गुन्ह्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. गेल्या काही दिवसांतील घडलेल्या घटना पाहता राज्यात कायदा सुव्यवस्था काही उरली आहे की नाही असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. याचदरम्यान मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दसऱ्याच्या दिवशी घाटकोपरमध्ये चोरीची विचित्र घटना घडली. एका चोरट्याने चक्क स्कूलबसच पळवल्याचे उघड झाले. मात्र पाठलाग होताच, घाबरलेल्या त्याने नाल्यात उडी मारली. अखेर या चोरट्याला स्थआनिकांनी पकडलं आणि पोलिसांनाच्या ताब्यात दिलं. याप्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरू आहे.

दसऱ्यानिमित्त सुरू होती पूजा, तेवढ्या चोराने डाव साधला

शनिवारी, दसऱ्याच्या दिवशी ही चोरीची विचित्र घटना घडली. दसऱ्यानिमित्त स्कूलबसचे चालक पूजा करण्यात व्यस्त होते. मात्र तेवढ्यात तेथे चोरट्याने डाव साधला. मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या गणेश ट्रान्सपोर्टची ही बस असून शनिवारी दसऱ्या निमित्त पूजा करण्यासाठी ती बस घाटकोपर बेस्ट बस समोर उभी केली होती. गणेश ट्रान्सपोर्टच्या याच ठिकाणी अन्य पाच बसही उभ्या होत्या. बसचे ड्रायव्हर हे बसची मनोभावे पूजा करत होते चालकांनी बसची पूजा केल्यानंतर सर्वजण प्रसाद खाण्यात व्यस्त असताना अचानक तेथे आलेल्या एका चोरट्याने उभ्या असलेल्या बसपैकी एक बस पळवली.

हे पाहून सगळेच चक्रावले. मात्र त्यानंतर मालकाने प्रसंगावधान दाखवत त्या चोराचा पाठलाग सुरू केला. चोरटा पस भधाव वेगाने चालवत होता, मात्र त्यांनी हार मानली नाही. अखेर वडाळा परिसरात बससमोर कार उभी करून ती बस थांबवली आणि चोरट्याला पकडलं. स्थानिकांच्या मदतीने त्या चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. पंतनगर पोलीस स्टेशनमधील अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. यामुळे एकच खळबळ माजली आहे.