मुंबई : रविवारी जॉगिंग करताना महिला सीईओ राजलक्ष्मी यांना आपल्या भरधाव कारने ठोकरून त्यांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याच्या प्रकरणातील रॅश ड्रायव्हरचे ड्रायव्हींग लायसन्स सस्पेंड करण्याची शिफारस मुंबई पोलीसांनी प्रादेशिक परिवहन विभागाला केली आहे. एका बड्या कंपनीच्या सीईओ असलेल्या राजलक्ष्मी विजय यांचा भरधाव टाटा निक्सॉनने उडविल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की राजलक्ष्मी तब्बल 20 फूट अंतररावर जाऊन पडल्या होत्या.
वरळी सी अपघातातील चालकासह मुंबईतील दोघा ड्रायव्हरचा वाहन चालक परवाना सस्पेंड करण्याच्या सूचना आरटीओला केल्या आहेत. पुणे येथील एका टेक्नो फर्मच्या महिला सीईओ राजलक्ष्मी यांना त्या जॉगिंग करीत असताना वरळी सी फेस येथे एका भरधाव टाटा निक्सॉन ठोकरल्याने त्यांचा रविवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणातील चालकाचे ड्रायव्हींग लायसन्स सस्पेंड करण्याच्या सूचना प्रादेशिक परिवहन विभागाला करण्यात आली आहे. पहिली घटना ड्रंक ड्रायव्हिंगची असून त्यात विश्वास अट्टावर यांची पत्नी शीतल यांचे लायसन्स तीन वर्षीय मुलीच्या अपघाती मृत्यू प्रकरणात सस्पेंड करण्याची शिफारस केली आहे. मार्च 2018 ते मार्च 2023 मध्ये रॅश आणि धोकादायक पद्धतीने ड्रायव्हींग केली आहे.
किमान तीन महिने ड्रायव्हींग लायसन्स सस्पेंड
दुसरी घटना अर्थात वरळी सी फेसच्या सीईओच्या अपघाती मृत्यूची असून त्यात बिजल धर्मेश मर्चंट याने तीनदा रॅश ड्रायव्हिंग केल्याने त्याचे लायसन्स सस्पेंड करण्याची शिफारस केल्याचे सह पोलीस आयुक्त ( वाहतूक ) प्रवीण पडवळ यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले. या प्रकरणात किमान तीन महिने ड्रायव्हींग लायसन्स सस्पेंड केले जाते.
Linkedin वरील पोस्ट पुन्हा व्हायरल
राजलक्ष्मी विजय यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन – 2023 मध्येही सहभाग घेतला होता. त्यांची Linkedin वरील पोस्ट पुन्हा व्हायरल झाली आहे, त्यात त्यांनी रोनाल्ड रूक यांचे एक वाक्य प्रसिद्ध वाक्य पोस्ट केले होते. त्यात म्हटले होते की ‘माझ्या जीवनाचे दिवस वाढावेत म्हणून मी धावत नाही, तर माझ्या दिवसांत जीवन वाढावे म्हणून मी धावते आहे.’