मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरण चर्चेत आहे. त्यानंतर एनसीबीनं मुंबईतल्या अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. तसेच एनसीबीच्या या धाडींमध्ये बराच मुद्देमाल जप्त केलाय. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज सप्लायर्सच्या विरोधात एक विशेष मोहीम चालवली जात आहे, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज सप्लायर्सवर नजर ठेवली जात आहे. एका महिलेकडून 7 किलो हेरॅाईन जप्त करण्यात आले असून, जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत अंदाजे 21 कोटी रुपये आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलीय.
अटकेतील संबंधित महिला ही मुंबईतील टॉप ड्रग्ज पेडलर्सपैकी एक आहे. एक मोठं रॅकेट समोर आलं असून, संबंधित महिला 10 वर्षांपासून या धंद्यात आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या युनिट 7नेही कारवाई केलीय. आतापर्यंत 8 नवीन प्रकरणं समोर आली असून, त्यामध्ये 16 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलेय, त्यापैकी तीन जणांना राजस्थानमधून अटक करण्यात आलीय.
राजस्थान ते मुंबई अशी ही एक पुरवठा साखळी सुरू होती. ह्युमन कुरिअर्सचा वापर करत मुंबईत ड्रग्जचा हा प्रवास केला जात होता. या तपासात आम्हाला काही नावं कळाली आहेत, ज्यांची नावं आम्ही लवकरच उघड करणार असल्याचं क्राईम ब्रँचच्या युनिट 7ने सांगितलंय. आतापर्यंत दोन व्यक्तींना अटक केली असून, अजून तपास सुरू आहे.
मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी हाय कोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केलाय. विशेष एनडीपीएस सेशन्स कोर्टाच्या निकालाला आर्यनच्या वकिलांमार्फत हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. आर्यन खानच्या वतीनं जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आलाय. मात्र, न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्याकडून आजचं कामकाज बरखास्त करण्यात आल्यानं आर्यन खानला आजची रात्र तुरुंगात राहावं लागणार आहे.
इतर बातम्या:
आर्यन खानची केस फेक, मुंबईत दहशत माजवण्याचा-खंडणीचा धंदा सुरुय, सर्वांचे पुरावे देणार : नवाब मलिक
Aryan Khan Drugs Case | शाहरुखला पुन्हा झटका, ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला