सहकाऱ्याच्या अंत्यविधीला गेले.. अमरधामच्या बाहेर पडताच घडली गंभीर घटना…

| Updated on: Oct 29, 2022 | 7:10 PM

अमरधाम येथे मकरंद पंचाक्षरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यावर नातवाईक, नागरिक आणि मित्रपरिवार बाहेर पडण्याच्या तयारीतच होते.

सहकाऱ्याच्या अंत्यविधीला गेले.. अमरधामच्या बाहेर पडताच घडली गंभीर घटना...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिकमध्ये मद्यधुंद कारचालकाने अक्षरशः रोडवर धिंगाणा घातला आहे. नाशिकच्या अमरधाम रोडवर हिट अँड रनची घटना घडल्याची बाब समोर आली आहे. या घटनेत अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना चिरडल्याने ते गंभीर जखमी झाली आहे. नानावलीच्या दिशेने जाणाऱ्या कारचालकाने ही धडक दिली असून धडकेत जखमी झालेले सर्वजणांना जिल्हा शासकीय रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याने मोठा आवाज यावेळी आल्याने परिसरातील नागरिक देखील धावून आले होते. नाशिकच्या सिटी लिंकचे कर्मचारी यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या सहकाऱ्यांना मद्यधुंद कारचालकाने धडक दिल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. शीतळादेवी परिसरात ही घटना घडल्याने तात्काळ पोलीस कर्मचारी देखील हजर झाले होते.

नाशिकच्या सिडको परिसरात राहणारे सिटी लिंक बस चालक मकरंद पंचाक्षरी यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाम येथे एक वाजता नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार आलेला होता.

अमरधाम येथे मकरंद पंचाक्षरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यावर नागरिक बाहेर पडण्याच्या तयारीतच होते.

हे सुद्धा वाचा

त्यात सिटी लिंकचे काही कर्मचारी आणि मित्रपरिवार शीतळादेवी परिसरात उभा होता, दुखाच्या घटनेत सर्वजण शांत स्थितीच उभे होते.

याच वेळी नानावली परिसरातून एक कार भरधाव वेगाने आली, उभ्या असलेल्या दहा बारा जणांना त्यांनी जोरात धडक दिली, त्यात दहा जण गंभीर जखमी असून दोघे किरकोळ जखमी आहेत.

मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान घडलेल्या घटनेत चारचाकी एम एच 05 ए एक्स 3957 या क्रमांकाच्या कारने धडक दिल्याने गाडीचा चक्काचूर झाला आहे.

या घटणेनंतर आलेल्या नातेवाइकांनी आणि पंचाक्षरी यांच्या मित्रांनी जखमी यानं पोलीसांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.