65 वर्षीय वृद्ध प्रवासी गंभीर जखमी, कमरेजवळ फ्रॅक्चर… रिक्षा चालकानं असं काय केलं ?

| Updated on: Nov 21, 2022 | 4:08 PM

नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा उलटून झालेल्या अपघातात वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

65 वर्षीय वृद्ध प्रवासी गंभीर जखमी, कमरेजवळ फ्रॅक्चर... रिक्षा चालकानं असं काय केलं ?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिकमधील रिक्षा चालकांची मुजोरी काही केल्या थांबायला तयार नाहीये. नाशिकमध्ये रिक्षाचालकाच्या संदर्भात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 65 वर्षीय एक वृद्ध प्रवासी यामध्ये जखमी झाले असून त्यांना कमरेजवळ फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानक येथून एका रिक्षा चालक 65 वर्षीय प्रवासी यांना घेऊन येत असतांना मोठा अपघात झाला आहे. नाशिकरोड येथून गंगापूर रोडच्या दिशेने येत असतांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने रिक्षा चालवत असतांना रिक्षा उलटल्याने हा अपघात घडला आहे. मद्यसेवन करून रिक्षा चालवणारा व्यक्ती अपघात होताच फरार झाला होता. रात्रीची वेळ असल्याने वृद्ध प्रवासी रिक्षातच बराच वेळ अडकून पडले होते. मला वाचवा म्हणून प्रवासी आपल्याला बाहेर काढेल असा आवाज देत होते, मात्र तरीही रिक्षा चालक थांबला नाही.

नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा उलटून झालेल्या अपघातात वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

संबंधित वृद्ध व्यक्ती ही नाशिकरोड रेल्वेस्थानक येथून गंगापूर रोडला रिक्षाने जात होते, रिक्षा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने भरधाव वेगाने रिक्षा चालवत होता.

हे सुद्धा वाचा

मात्र, भरधाव वेगाने रिक्षा चालवत असतांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या स्मार्ट रोडवरील गतिरोधकावरुन रिक्षा उलटली आणि लांब सरकत गेली होती.

यामध्ये वृद्ध प्रवासी गंभीर जखमी झाले आहे, त्यात त्यांच्या कमरेजवळ फ्रॅक्चर झाले असून याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात कळविले आहे.

वृद्ध व्यक्ती हे प्रतिष्ठित असल्याने त्यांनी याबाबत कुठलीही वाच्यता केली नसून सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षा चालकाचा पोलीस शोध घेत असून मुजोर रिक्षा चालकावर कारवाईची मागणी केली जात आहे.