फरीदाबाद : एकेकाळी श्रावण बाळाने त्याच्या वृद्ध मात्या- पित्याची सेवा करून एक आदर्श उदाहरण समोर ठेवले होते. पण आई-मुलाच्या प्रेमळ नात्यावरचा विश्वासच उडून जाईल अशी क्रूर घटना समोर आली आहे. कलियुगात मद्यपी मुलाने त्याच्या वयोवृद्ध आईला (son beaten up his mother) बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत 80 वृद्ध महिला एवढी जखमी झाली आहे की तिचा जीव जाता जाता राहिला. अर्धमेल्या अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या वर सध्या इमर्जन्सी विभागात उपचार सुरू आहेत.
फरीदाबाद येथे ह क्रूर घटना घडली आहे. येथील ५ नंबर विभागात राहणाऱ्या कलियुगी मुलाने आपल्या वृद्ध आईला लाथा-बुक्क्यांनी तुडवले. ही मारहाण एवढी क्रूर होती की त्या महिलेचा जीवच गेला असता. मुलाने केलेल्या अनेक जखमा आईच्या अंगावर असून त्याच्या क्रौर्याची साक्ष देतात. त्या वृद्ध महिलेच्या मानेवरही खोल जखमा आहेत. जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या मानेवर लाथ मारण्यात आल्याचे समजते.
मुलाचा फोन आला अन् समोर आले भयानक सत्य
आरोपीचा अल्पवयीन मुलगा हर्ष याने त्याचा काका मुकेश यांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिल्यावर ही क्रूर घटना उघडकीस आली. वडिलांनी आजीला बेदम मारहाण केली आहे, असे हर्षने त्याच्या काकांना फोनवरून सांगितले. त्या वृद्ध महिलेच्या ओरडण्याचा, रडण्याचा आवाज शेजाऱ्यांनीही ऐकला, त्यानंतर पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली आहे.
पत्नीही सोडून गेली
मिळालेल्या महिलेनुसार, त्या 80 वर्षीय वृद्ध महिलेला तिचाच पोटचा मुलगा गेल्या दोन-दिवसांपासून मारहाण करत आहे. दारूच्या नशेत तो हे कृत्य करत होता. यापूर्वी तो त्याच्या माजी पत्नीलाही अशीच मारहाण करत असे. या जाचाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली आणि दोन मुलींसह माहेरी राहू लागली.
दरम्यान, पीडित महिलेने दिलेल्या जबाबाच्या आधारे आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर तो आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा कसून तपास करत असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी नमूद केले. पीडित महिलेचा दुसरा मुलगा मुकेश यानेही पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.