रिक्षा भाड्याचे पैसे मागितले म्हणून गुडांनी केली बेदम मारहाण, तरूणाचा जीवच गेला

| Updated on: May 08, 2023 | 3:58 PM

Crime in Bihar: ही घटना सारणमधील सहजितपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिपरा गावातील आहे. पैसे मागितल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली.

रिक्षा भाड्याचे पैसे मागितले म्हणून गुडांनी केली बेदम मारहाण, तरूणाचा जीवच गेला
Follow us on

छपरा : छपरा येथे एका ई-रिक्षा चालकाला (e rickshaw driver) काही लोकांनी बेदम मारहाण करून त्याचा जीव (killed by goons) घेतला. त्या ई-रिक्षाचालकाचा गुन्हा एवढाच होता की त्याने या आरोपींकडून भाडे मागितले होते. ही घटना सारणमधील सहजितपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिपरा गावातील आहे. मिठू कुमार (३४) असे ठार झालेल्या ई-रिक्षा चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोनू सिंग असे अटक आरोपीचे नाव आहे. रिक्षाचालक मिठूचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

मृत ई-रिक्षा चालक मिठूची पत्नी चंद्रकला देवी हिने सांगितले की, काही लोकांनी फोन करून त्यांना बोलावून घेतले आणि त्याला ठार करून मृतदेह फेकून दिला. मिठू ई-रिक्षा चालवून कुटुंबाचे पोषण करत असे. या घटनेतील आरोपी सोनूच्या घरी काही कार्यक्रम होता आणि मिठूने त्या कार्यक्रमासाठी ई-रिक्षातून सामाना आणून दिले होते. संध्याकाळी त्याने आरोपीकडे रिक्षा भाड्याचे पैसे मागितले असता आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली.

त्यानंतर पैसे देण्याच्या बहाण्याने आरोपी त्याला लांबवर घेऊन गेला. आणि तेथे इतर काही तरुणांसोबत मिळून मिठू याला बेदम मारहाण केली. तो इतका जखमी झाला होता, की त्याचा जीवच गेला. रात्री उशिरापर्यंत मिट्टू घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला असता त्याचा मृतदेह सापडला.

या हत्येप्रकरणी सहजितपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर मुख्य आरोपी सोनू सिंग हा फरार आहे. पोलिसांनी याला परस्पर वादाचे प्रकरण म्हटले आहे. एसपी गौरव मंगला यांनी सांगितले की, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीत या घटनेतील अनेक तथ्य समोर आले आहेत. ज्याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.