कोलकाता : पश्चिम बंगालमधील मंत्री पार्थ मुखर्जी (Parth Chatterjee) यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherji) यांच्या घरावर आज ईडीने छापेमारी (ED Raid) केली. अनेक तासापासून ईडीची छापेमारी सुरुच आहे. आतापर्यंत 20 कोटी रुपयांची रोख रक्कम अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून जप्त करण्याता आली आहे. घरामध्ये 200 आणि 500 रुपयांच्या नोटांचा अक्षरशः ढीग लागला आहे. बंगाल शिक्षण भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. अर्पिता मुखर्जी यांच्या विरोधात ईडीला काही सबळ पुरावे मिळाल्यानंतर त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. गेल्या अनेक तासांपासून ही कारवाई सुरु आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत नोटांचा ढिगारा समोर आला आहे. अद्याप कारवाई सुरु असून या ढिगाऱ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
ED is carrying out search operations at various premises linked to recruitment scam in the West Bengal School Service Commission and West Bengal Primary Education Board. pic.twitter.com/i4dP2SAeGG
हे सुद्धा वाचा— ED (@dir_ed) July 22, 2022
पश्चिम बंगालमध्ये ईडी सध्या इतर अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. यामध्ये मंत्री पार्थ चॅटर्जी, राज्याचे शिक्षण मंत्री माणिक भट्टाचार्य, आलोक कुमार सरकार, कल्याण मोय गांगुली यांचाही या यादीत समावेश आहे. बंगालच्या शिक्षण भरती घोटाळ्यात हे सर्व कनेक्शन उघडकीस आले आहेत. मात्र सर्वात मोठी कारवाई अर्पितावर झाली आहे. अर्पिता यांच्या घरातील छापेमारीत ईडीने 20 फोनही जप्त केले आहेत. अर्पिता या फोनच्या माध्यमातून काय करायच्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, ईडी याचाही तपास करत आहे. नोटांचा ढिगारा मोजण्यसाठी बँक अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले आहे. तसेच नोटा मोजण्याची मशिनही आणण्यात आली आहे. सध्या त्यांच्या घरी नोटांची मोजणी सुरूच आहे, त्यामुळे एकूण आकडा जास्त असू शकतो.
मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या घरीही गेल्या 11 तासांपासून ईडीची एक टीम कारवाई करत असल्याची माहिती मिळते. त्यांच्या घरातून काय सापडले, काय जप्त करण्यात आले, याबाबत ईडीने अद्याप काहीही सांगितले नाही. मात्र तपास सुरू असून, इतर ठिकाणीही ईडीची पथके अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. ईडीच्या हाती अनेक कागदपत्रेही लागली आहेत. यात बनावट कंपन्यांची कागदपत्रे आहेत आणि परदेशी चलनही जप्त करण्यात आले आहे. बंगालच्या राजकारणात या शिक्षण घोटाळ्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने बंगाल शिक्षण भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी सीबीआय हे प्रकरण हाताळत होती. मात्र तपासादरम्यान मनी लाँड्रिंगचेही प्रकरण समोर आल्याने ईडीही या तपासात सामील झाली. (ED seized huge cash in Arpita Mukherjees house in West Bengal)