कार पार्किंग वरुन झालेल्या वादात एका कुटुंबाला गुंड बोलावून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात मुलाला झालेल्या मारहाणी वयोवृद्ध वडीलांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उल्हासनगरात घडलेल्या या घटनेनंतर या पीडित कुटुंबावरच राजकीय दबावाने पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याची उफराटा न्याय घडला आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज आपल्याकडे असून ते पाहून आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी पीडित करतार सिंग यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
उल्हासनगरात गाडी पार्किंगवरून झालेल्या वादात बाहेरून गुंड मागवून एका पंजाबी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. मुलावर झालेला हा भयानक हल्ला पाहून पीडिताच्या वयोवृद्ध वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या दबावाने उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलिस ठाण्याने पीडितावरच कलम ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे उघडकीस आले आहे.
ही घटना आपल्या वडिलांनी पाहिली त्यामुळे ते प्रचंड घाबरले. त्यांचा रक्तदाब वाढून त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पीडित कुलदीप करतार यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. आपल्या वडीलांना घेऊन आपण हॉस्पिटल येथे गेलो आणि नंतर घरी जाऊन झोपलो त्यानंतर ज्यांना गुंड मागवून मारहाण केली त्यांनी आमच्या कुटुंबाच्या विरोधातच कलम ३२४ चा गुन्हा दाखल केल्याचे करतार सिंग यांनी म्हटले आहे. शिवसेना माजी नगरसेवकाच्या दबावामुळे मध्यवर्ती पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याचे आरोप करतार सिंग यांनी केला आहे. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलं आहे.
उल्हासनगर कॅम्प तीनच्या पंजाबी कॉलनीतील सिंग सभा पंचायती गुरुद्वारासमोरील गल्लीत रहिवाशांच्या कार पार्क केल्या जातात. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास करतार सिंग हे आपली कार घेऊन गेले. प्रितपाल सिंग यांच्या दोन कार त्या जागेवर पार्क केल्या असल्याने करतार यांनी प्रीतपाल यांच्या घराच्या दरवाजा वाजवून कारची चावी मागितली. मात्र प्रीतपाल आणि करतार यांच्यात वाद झाला. त्यात प्रितपाल यांनी करतार यांना लाथ मारली. हे भांडण सोडविण्यासाठी शिवसेना माजी नगरसेवक कलवंत सिंग सोहता आले.
यावेळी बाहेरील गुंड प्रवृत्तीच्या बिल्ला, हनी सरदार यांच्यासह १० ते १५ जणांनी करतार आणि त्यांचा मुलगा कुलदीप यांना बेदम मारहाण केली. ही सर्व घटना करतार यांचे वयोवृद्ध वडील रांझा सिंग यांनी पाहिली. यामुळे घाबरलेल्या रांझा सिंग यांचा रक्तदाब वाढून त्यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.करतार सिंग यांना मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पोलिसांसमोर मारहाण झाली असतानाही पोलिसांनी उलट करतार सिंग यांच्याच कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला. करतार यांनी मध्यवर्ती पोलीसांकडे तक्रार करायला गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर करतार यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्याकडे तक्रार केली आहे.