तरुणाची वृद्ध महिलेला बेदम मारहाण, कारण ऐकून हैराण व्हाल !

| Updated on: Oct 10, 2022 | 6:18 PM

डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसर हा नेहमी गजबजलेला असतो. यामुळे या परिसरात नेहमी गर्दी असल्याने धक्काबुक्कीचे प्रकार नेहमी घडत असतात.

तरुणाची वृद्ध महिलेला बेदम मारहाण, कारण ऐकून हैराण व्हाल !
तरुणाची वृ्द्ध महिलेला बेदम मारहाण
Image Credit source: TV9
Follow us on

सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : गर्दीत धक्का लागला म्हणून एका तरुणाने चक्क वृद्ध महिलेला बेदम चोपल्याची (Women beatened by youth) धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या (Accused Arrested by Ramnagar Police) ठोकल्या आहेत. सोहम संतोष सावंत असे 21 वर्षीय आरोपीचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात (Dombivali east station area) रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. अंजली भोजी देवडिगा असे मारहाण झालेल्या 64 वर्षीय वृद्धेचे नाव आहे.

स्टेशन परिसरात भाजीपाला खरेदीसाठी आली होती महिला

डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसर हा नेहमी गजबजलेला असतो. यामुळे या परिसरात नेहमी गर्दी असल्याने धक्काबुक्कीचे प्रकार नेहमी घडत असतात. रविवारी संध्याकाळी वृ्द्ध महिला रेल्वे स्थानक भागात भाजीपाला खरेदीसाठी आल्या होत्या. बाजारपेठेत खरेदी झाल्यानंतर त्या रामनगरमधील तुकारामनगर रिक्षा स्टँडकडे पायी चालल्या होत्या.

सुट्टीचा दिवस असल्याने स्टेशन परिसरात गर्दी होती

रविवार सुट्टीचा दिवस आणि त्यात खरेदीसाठी गर्दी असल्याने पायी चालताना अंजली यांचा धक्का बाजूने चाललेल्या दोन तरुणांना लागला. अंजली यांनी याबद्दल चूक मान्य केली. तरीही आपणास मुद्दाम धक्का मारला म्हणून सोहम सावंत याने अंजली यांना भररस्त्यात बेदम मारहाण सुरू केली.

हे सुद्धा वाचा

मारहाणीमुळे वृद्धेच्या शरीरावर जखमा

यावेळी रस्त्यावरील इतर नागरिकांनी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. हातामधील कड्याने तो या वृद्धेला मारहाण करत होता. या मारहाणीमुळे वृद्धेच्या अंगावर व्रण आणि जखमा झाल्या आहेत. सध्या महिलेवर उपचार सुरु आहेत.

रामनगर पोलिसांकडून आरोपीला बेड्या

याप्रकरणी जखमी वृ्द्धेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वृद्धेच्या तक्रारीनंतर रामनगर पोलिसांनी तरुणाचा शोध घेत त्याला दिव्या जवळच्या दातिवली गावातील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या. याबाबत फौजदार एस. जी. पाटील अधिक तपास करत आहेत.