Electric Bike : इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीने घेतला चिमुकल्याचा बळी, भाजलेला चिमुकला पाहून…

| Updated on: Oct 03, 2022 | 8:09 AM

मृत झालेल्या चिमुकल्याचं नाव शब्बीर शाहनवाज अन्सारी असं मुलाचं नाव आहे. वसईपुर्व येथील रामदासनगरमध्ये ही घटना घडली आहे.

Electric Bike : इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीने घेतला चिमुकल्याचा बळी, भाजलेला चिमुकला पाहून...
इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीने घेतला चिमुकल्याचा बळी
Image Credit source: twitter
Follow us on

वसई : पेट्रोलला पर्याय म्हणून भारताने मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Bike) आणल्या, परंतु त्या स्कुटर आता जिवघेण्या ठरू लागल्या आहेत. भारतात आत्तापर्यंत इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे उन्हाळ्यात चालत्या गाड्यांनी पेट घेतला आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. काल वसईमध्ये (Vasai) एका चिमुरड्याचा इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीने (Battery Blast) बळी घेतला आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग लावलेली होती, त्यावेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाला. त्यामध्ये सात वर्षाचा चिमुकला 70 ते 80 टक्के भाजला. तिथं जमलेल्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

मृत झालेल्या चिमुकल्याचं नाव शब्बीर शाहनवाज अन्सारी असं मुलाचं नाव आहे. वसईपुर्व येथील रामदासनगरमध्ये ही घटना घडली आहे. 23 सप्टेंबरच्या रात्री चिमुकल्याच्या वडिलांनी शाहनवाज अन्सारी यांनी घराच्या हॉलमध्ये गाडीची बॅटरी चार्जिंगला लावली होती. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारात त्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला.

हे सुद्धा वाचा

त्यावेळी हॉलमध्ये झोपलेला शब्बीर आणि त्याची आई त्या दुर्घनेमध्ये भाजली. शब्बीर अधिक अधिक भाजला असल्यामुळे त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.